nepali congress : नेपाळमध्ये नेपाळी काँग्रेसची सत्ता आहे. 13 ऑगस्टला शेर बहादूर देउबा पंतप्रधान झाले. त्याला एक महिना झाला आहे. यापूर्वी केपी शर्मा ओली पंतप्रधान होते. ते पंतप्रधान असताना भारत-नेपाळमधील संबंध बिघडले होते. आता नेपाळी काँग्रेसने भारत आणि चीनबद्दल म्हटले आहे की, चीन भारताची ‘खास’ शेजारी म्हणून जागा घेऊ शकत नाही. लिम्पियाधुरा-कालापानी-लिपुलेख प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याचा पक्षाने आग्रह धरला आहे. china cannot take india place as a special neighbour says nepali congress leader uday shamsher rana
वृत्तसंस्था
काठमांडू : नेपाळमध्ये नेपाळी काँग्रेसची सत्ता आहे. 13 ऑगस्टला शेर बहादूर देउबा पंतप्रधान झाले. त्याला एक महिना झाला आहे. यापूर्वी केपी शर्मा ओली पंतप्रधान होते. ते पंतप्रधान असताना भारत-नेपाळमधील संबंध बिघडले होते. आता नेपाळी काँग्रेसने भारत आणि चीनबद्दल म्हटले आहे की, चीन भारताची ‘खास’ शेजारी म्हणून जागा घेऊ शकत नाही. लिम्पियाधुरा-कालापानी-लिपुलेख प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याचा पक्षाने आग्रह धरला आहे. अलीकडेच, पंतप्रधान देउबा यांनी त्यांच्या सहयोगी भागीदारांसह समान किमान कार्यक्रम सुरू केला आहे. नेपाळने गेल्या वर्षी लिम्पियाधुरा-कालापानी-लिपुलेख क्षेत्र आपल्या नकाशामध्ये समाविष्ट केल्याचा दावा केला होता.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, नेपाळचे माजी अर्थ राज्यमंत्री आणि नेपाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदय शमशेर राणा यांनी म्हटले आहे की, नेपाळ ‘शेजारी प्रथम’ या तत्त्वावर काम करत राहील. यासह आम्ही इतर देशांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवू. ते म्हणाले, ‘नेपाळला बीजिंगची गरज आहे आणि चीन आपला चांगला शेजारी आहे, पण भारत खास आहे. चीन भारताची जागा घेऊ शकत नाही. ते पुढे म्हणाले की, पीएम देउबा यांना नाजूक आघाडी सरकारचे नेतृत्व करत असल्याने समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवाव्या लागतील. युतीतील भागीदारांना सोबत घेताना देउबा यांना भारताबरोबरच चीनशी स्थिर संबंध ठेवावे लागतील.
भारताकडून नेपाळच्या विकासात मोठ्या प्रमाणावर सहकार्य
नेपाळबाबत भारताचे म्हणणे आहे की, नेपाळचे भारतासाठी सामरिक महत्त्व आहे. भाजपचे प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल यांनी म्हटले आहे की, नवी दिल्ली काठमांडूसोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. काठमांडू येथील भारतीय दूतावासानुसार भारत नेपाळच्या विकासात मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य, जलसंपदा, शिक्षण, ग्रामीण आणि सामुदायिक विकास इत्यादीमध्ये तळागाळात काम सुरू आहे.
कोरोना विषाणूच्या महामारीनंतर अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी नेपाळला भारताच्या मदतीची गरज आहे. नेपाळी काँग्रेस सत्तेवर येताच, चीनच्या राज्य माध्यमांनी असे सांगण्यास सुरुवात केली की नेपाळी काँग्रेसचा दृष्टिकोन भारताकडे असणार आहे. तथापि, ग्लोबल टाइम्सने म्हटले होते की, नेपाळ आणि चीनमधील संबंध दृढ राहतील. नेपाळ इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे संचालक भास्कर कोईराला म्हणतात की, भारत-नेपाळ संबंधांसाठी भविष्य उज्ज्वल आहे.
china cannot take india place as a special neighbour says nepali congress leader uday shamsher rana
महत्त्वाच्या बातम्या
- वीर जवान तुझे सलाम : कॅप्टन आशुतोष आणि मेजर अरुण कुमार पांडे यांना शौर्य चक्र, काश्मीरमध्ये कट्टर दहशतवाद्यांचा केला होता खात्मा
- जम्मू -काश्मिरात यावर्षी खास असणार स्वातंत्र्यदिन, तब्बल 23,000 सरकारी शाळांवर तिरंगा फडकणार
- UP Election : मुख्यमंत्री योगींविरोधात निवडणूक लढणार माजी IPS अमिताभ ठाकूर , म्हणाले- ही तत्त्वांची लढाई !
- तालिबानची कोरोना लसीवर बंदी, अफगाणचा 65 टक्के भूभाग व्यापला, राजधानी काबूलवरही लवकरच कब्जा करण्याची तयारी
- बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख उघड केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी