• Download App
    तालिबानच्या मदतीला ड्रॅगन आला धावून, तालिबानवर निर्बंध न लादण्याचा सल्ला China came forward to help Taliban

    तालिबानच्या मदतीला ड्रॅगन आला धावून, तालिबानवर निर्बंध न लादण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग – अमेरिका आणि तालिबान यांच्यात चर्चा सुरु असतानाच चीननेही तालिबानी म्होरक्यांबरोबर राजनैतिक मार्गाने संपर्क साधला आहे. तालिबानने १५ ऑगस्टला काबूलचा ताबा मिळविल्यानंतर अमेरिका आणि भारतासह अनेक देशांनी आपापले दूतावास बंद केले असले तरी पाकिस्तान, रशिया आणि चीनने दूतावास सुरुच ठेवले आहेत. China came forward to help Taliban

    चीनचे अफगाणिस्तानमधील राजदूत वँग यू आणि तालिबानच्या राजकीय विभागाचा उपप्रमुख अब्दुल सलाम हनाफी यांच्यात काबूलमध्ये चर्चा झाली. अफगाणिस्तानमध्ये अफगाण लोकांचेच वर्चस्व असावे आणि त्यांच्याच नियमानुसार कारभार चालावा, या भूमिकेला चीनचा पाठिंबा आहे. त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याची आमची इच्छा आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यास आणि या देशाची पुनर्बांधणी करण्यास आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत,’’ असे चीनचे प्रवक्ते वेनबिन म्हणाले..

    इतर अनेक देशांनी नागरिकांच्या सुटकेसाठी मोहिम राबविली असली तरी चीनने कोणतीही घाई केलेली नाही. तसेच, तालिबानचा प्रमुख म्होरक्या मुल्ला अब्दुल घनी बरादर याच्याबरोबर गेल्या महिन्यात त्यांनी चर्चाही केली होती.

    अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांनी भूतकाळापासून काही तरी धडा घ्यावा. अफगाणिस्तानमधील समस्या सोडविण्यासाठी तालिबानवर निर्बंध टाकले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे मतही चीनने व्यक्त केले आहे.

    China came forward to help Taliban

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या