• Download App
    कॅनडातील शाळेच्या आवारात सापडले १८२ मुलांचे सांगाडे Children skeleton found in Canada school

    कॅनडातील शाळेच्या आवारात सापडले १८२ मुलांचे सांगाडे

    वृत्तसंस्था

    क्रॅनब्रूक (कॅनडा) – गेल्या शतकात बंद पडलेल्या निवासी शाळांमध्ये आदिवासी वंशाच्या मुलांवर क्रूर अत्याचार झाल्याची दोन प्रकरणे नुकतीच उघडकीस आली असताना आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील क्रॅनब्रूक शहरात सेंट युजिन्स मिशन स्कूलच्या आवारात १८२ मानवी सांगाडे पुरलेले आढळले. Children skeleton found in Canada school

    कॅनडामध्ये रोमन कॅथोलिक चर्चद्वारे आदिवासी समुदायातील मुलांसाठी निवासी शाळा चालविल्या जात असत. या शाळांमध्ये मुलांवर अत्याचार होत असल्याचे आणि या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यूही होत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या महिन्यातच एका बंद पडलेल्या शाळेच्या आवारात २१५ मुलांचे सांगाडे आढळले होते, तर काही दिवसांनी दुसऱ्या एका शाळेच्या आवारात सातशेहून अधिक थडगी आढळली होती. त्यामुळे देशभरातील इतर निवासी शाळांच्या आवारातही रडारच्या मदतीने शोध घेतला जात आहे.



    या दरम्यानच सेंट युजिन्स मिशन स्कूलच्या आवारात तीन मीटर खोलीवर १८२ सांगाडे सापडले. ही शाळा १९१२ ते १९७० या कालावधीत सुरु होती. गेल्या शतकातील या घटनांबाबत कॅनडा सरकारने आदिवासी लोकांची वारंवार माफी मागितली आहे. या प्रकारात रोमन कॅथोलिक चर्चचाही सहभाग असल्याने पोप फ्रान्सिस हेदेखील डिसेंबरमध्ये कॅनडातील आदिवासी समुदायाची भेट घेत माफी मागणार आहेत.

    Children skeleton found in Canada school

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या