• Download App
    लहान मुलांनाही कोरोनाची लस ,इंजेक्शन नसून नेझल स्प्रेद्वारे ; रशियात सप्टेंबरपासून लसीकरण|Children corona vaccination by Nasal spray

    लहान मुलांनाही कोरोनाची लस ,इंजेक्शन नसून नेझल स्प्रेद्वारे ; रशियात सप्टेंबरपासून लसीकरण

    वृत्तसंस्था

    मॉस्को: आता लहान मुलांसाठी खास कोरोना लस तयार करण्यात आली आहे. ती इंजेक्शन स्वरूपात नसून नेझल स्प्रे स्वरूपात आहे. Children corona vaccination by Nasal spray

    रशियामध्ये ही लस तयार केली असून सप्टेंबरमध्येच लाँच केली जाणार आहे, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. सध्या भारतात परवानगी मिळालेल्या रशियाची स्पुतनिक V लसच आहे. जी रशियाच्या गॅमेलिया इन्स्टिट्यूने तयार केली आहे.



    गॅमेलिया इन्स्टिट्यूचे प्रमुख अॅलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितलं, आम्ही तयार केलेला नेझेल स्प्रे ही स्पुतनिक V लस आहे. ती फक्त इंजेक्शनऐवजी नोझलमार्फत दिली जाईल. 15 सप्टेंबरपासून ही लस उपलब्ध होईल.8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित आहे. या लशीची चाचणी केली आहे. कोणताही दुष्परिणाम दिसला नाही.

    भारतातही मुलांना लस देणार ?

    भारतातच तयार केलेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन लशीची लहान मुलांवर ट्रायल सुरू आहे. आठ आठवड्यात हे ट्रायल पूर्ण होणार आहे. रशियाच्या स्पुतनिक V लशीचाही चाचणीसाठी वापर लहान मुलांवरही होऊ शकतो.

    Children corona vaccination by Nasal spray

    Related posts

    NIA : रशियन इनपुटवरून NIA ने पकडले होते अमेरिकन-युक्रेनियन नागरिक; म्यानमार सीमेवर सशस्त्र गटांना प्रशिक्षण दिले

    Security Breach : अमेरिकेच्या परराष्ट्र-संरक्षण मंत्र्यांच्या घरावर संशयास्पद ड्रोन; सुरक्षेबाबत आपत्कालीन बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांना हलवण्यावर विचार

    Kim Jong Un : उत्तर कोरियात किम जोंग उन यांचा पक्ष विजयी; 99.93% मते मिळाली, सर्व जागा जिंकल्या