• Download App
    ‘’मागच्या जन्मीचं पुण्य आज माझ्या कामी येतय’’ मॉरिशसमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणानंतर फडणवीसांचे उद्गार! Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiled in Mauritius in presence of Deputy Chief Minister Devendra Fadnavis

    ‘’मागच्या जन्मीचं पुण्य आज माझ्या कामी येतय’’ मॉरिशसमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणानंतर फडणवीसांचे उद्गार!

    जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?, मराठी बांधवांसाठी ठरला अभिमानास्पद क्षण

    विशेष प्रतिनिधी

    मॉरिशस : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मॉरिशसमध्ये लोकार्पण झालं. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. या प्रसंगी मोठ्यासंख्येने मॉरिशसमधील मराठी बांधवांची उपस्थिती होती. शिवाय, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकल्याचे दिसून आले. Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiled in Mauritius in presence of Deputy Chief Minister Devendra Fadnavis

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’आज अत्यंत मनापासून आनंद होतोय, मी तर असं म्हणेण की मागच्या जन्मीचं पुण्य हे आज माझ्या कामी येतय की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी पाच हजार किलोमीटर दूर मॉरिशसमध्ये या ठिकाणी तुम्ही मला निमंत्रित केलं. मी मॉरिशसमधील मराठी मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो की, ज्याप्रकारे मराठी संस्कृतीला तुम्ही जपलं आहे. आज या ठिकाणी जी सादरीकरणं झाली, ती सगळी सादरीकरणं पाहून मला असं वाटत होतं, की आपण महाराष्ट्रातच आहोत. हे जे काही तुम्ही जपलं आहे.’’

    शिवाजी महाराजांनी आपल्याला महाराष्ट्र धर्म शिकवला –

    याचबरोबर ‘’खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्याला महाराष्ट्र धर्म शिकवला. तो काळ कसा होता, सगळीकडे अंधकार होता. अनेक मोठे राजे आणि राजवाडे हे देखील मंडलिक म्हणून काम करत होते. अत्याचाराने परिसीमा गाठली होती. सामान्य माणासाच्या जीवनात अंधकाराशिवाय काहीच नव्हतं. पिढ्या निघून जात होत्या, आम्ही कधीच यातून बाहेर येऊ शकणार नाही ही मानसिकता होती आणि अशा या परिस्थितीत आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांसारखा एक अतिशय तेजस्वी बालक जन्माला घातला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी हा बालक शपथ घेतो, देव-देश आणि धर्मासाठी मी लढेन आणि स्वराज्याची प्राप्ती करेन. ही जी भावना त्यांच्या मनात होती. त्यानंतर छत्रपती शिवरायांनी, खरं म्हणजे आपण त्यांना युगपुरूष का म्हणतो?  त्यांच्याजवळ सैन्य नव्हतं, मोठ्याप्रमाणावर सैनिक नव्हते. समोर मोगल होते, मोगलांकडे मोठे सैन्य होतं. अनेक देशांचे सरदार होते, त्यांना मोठं वेतन मिळत होतं, पैसा होता. पण महाराजांनी बारा मावळातील १८ पगडजातींना जमा केलं. ज्यांच्याकडे चेहरा नव्हता अशा लोकांना जमा केलं. जे सहा महिने शेती करायचे आणि शेतीवर जगायचे अशा लोकांना जमा केलं. शेतकरी, शेतमजूर, बाराबलुतेदार यांना जमा करून, त्यांच्यतील पौरुष जागृत करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि मग त्याच सामान्य दिसणाऱ्या मावळ्यांनी असामान्य काम करून मोगलांना पराजित करून महाराष्ट्र धर्माची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदू पदपादशाहीची स्थापना केली. छत्रपती शिवरायानंतर हेच हिंदवी साम्राज्य संपूर्ण देशात पसरलेलं आपण बघितलं.’’ असं फडणवीसांनी सांगितलं.

    छत्रपती शिवराय हे केवळ राजे नव्हते ते दृष्टे होते –

    याशिवाय, ‘’जसं मी म्हणालो छत्रपती शिवराय हे केवळ राजे नव्हते ते दृष्टे होते. त्यांनी ज्याप्रकारची राज्यव्यवस्था घडवली. त्या राज्यव्यवस्थेत सर्वांना समान अधिकार होता. कुठलाही भेद नव्हता आणि कोणालाही विशेष दर्जा नव्हता. चूक करणाऱ्यास शिक्षा होती, तर चांगलं वागणाऱ्यास प्रोत्साहन होतं. शेती कशी केली पाहिजे, शेतकऱ्यांना कशाप्रकारे दुष्काळातून बाहेर काढलं पाहिजे. जलसंवर्धन कसं केलं पाहिजे, जंगलं कशी वाचवली पाहिजे या प्रत्येक गोष्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञावली. ही आजही आपल्याला आश्चर्यचकित करून टाकते, की त्यावेळी इतका पुढचा विचार महाराज कसं करू शकत होते.’’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात वीरतेचं बाजीरोपण केलं –

    ‘’आज आपण बघतोय त्यांचे किल्ले ज्याप्रकारे ते तयार केले. अभेद्य अशाप्रकारचे किल्ले आणि त्यातून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्यात मोठी कुठली गोष्ट जर छत्रपती शिवरायांनी केली असेल, अनेकवेळा एखादा राजा होतो तो राजा शौर्य गाजवतो पण त्या राजानंतर ते शौर्य संपते. पण महाराजांनी प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये, केवळ मराठी माणसाच्याच नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वीरतेचं बाजीरोपण केलं. त्यानंतर इंग्रज येईपर्यंत मराठा साम्राज्याला, हिंदवी स्वराज्याला कोणी थांबवू शकलं नाही. हे महाराजांनी केलं आणि आजही हा महाराष्ट्र धर्म, हे हिंदवी स्वराज्य हे प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे. म्हणून साडेतीनशे वर्षानंतरही ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळा मॉरिशयसमध्ये  उभा राहतो. त्यावेळी त्याच्यासमोर सांष्टांग दंडवत घालण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित येतो. आज मला या गोष्टीचा आनंद आहे. मॉरिशयसमध्ये आल्यानंतर असं जाणवतं की मी माझ्या माणसांबरोबर आहे.’’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या.

    Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiled in Mauritius in presence of Deputy Chief Minister Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या