• Download App
    इस्राईल- पॅलेस्टाईनमध्ये अखेर युद्धबंदी, हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन साजरा केला आनंद Ceasefire between istrayel and palastine

    इस्राईल- पॅलेस्टाईनमध्ये अखेर युद्धबंदी, हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन साजरा केला आनंद

    विशेष प्रतिनिधी 

    जेरुसलेम – इस्राईल- पॅलेस्टाईनने शस्त्रसंधीला अखेर मान्यता दिली आहे. ही युद्धबंदी आजपासून अमलात येणार आहे. यामुळे या दोन देशांमध्ये गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आता थांबेल. Ceasefire between istrayel and palastine

    युद्धात विजय झाल्याचा दावा इस्राईल व ‘हमास’ या दोघांनीही केला आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर गाझा पट्टा आणि वेस्ट बँकमधील हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला. या आनंदात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, अनेकांनी गाणी गायली, रस्त्यावर संचलनही केले, असे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिरडिओत दिसत आहे.



    दोन्ही बाजूकडून होत असलेल्या रॉकेट व बाँब हल्ल्यात सुमारे २४० नागरिक ठार झाले आहेत. शस्त्रसंधी करून हिंसाचार थांबविण्यासाठी अमेरिका, इजिप्त आणि अन्य आंतरराष्ट्रीय मध्यस्तांकडून येत असलेला दबाव आणि शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यांत धुमसत असलेला दक्षिण इस्राईल व गाझा पट्टा यामुळे अखेर इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने काल रात्री युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला.

    जेरुसलेममधील धार्मिक ठिकाणांवर प्रवेश देण्यास इस्राईल अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप पॅलेस्टिनी नागरिकांनी केला होता. अल अक्सा मशिदीमध्ये रमझानच्या दरम्यान याच मुद्द्यावरून हिंसाचार झाला होता.

    Ceasefire between istrayel and palastine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही