वृत्तसंस्था
कॅलिफोर्निया : ‘मेटा’चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्स्टाग्राम आणि त्याचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमेरिकन राज्य न्यू मेक्सिकोने तक्रार दाखल केली. हे दोन्ही प्लॅटफॉर्म मुलांसाठी सुरक्षित नाहीत. तसेच ते अश्लीलतेचा व्यापार करण्यासाठी व अल्पवयीनांना सेक्ससाठी प्रवृत्त करणारे प्रमुख व्यासपीठ बनले आहे, असा दावा अॅटर्नी जनरल राऊल टोरेज यांनी केला आहे.Case Filed Against Meta CEO Mark Zuckerberg; Allegation that Facebook-Instagram is a haven for child exploitation
मेटाने फेसबुक-इन्स्टाग्रामला मुलांचा शोध घेणाऱ्या गुन्हेगारांचा बाजार बनवले असल्याचेही ते म्हणाले. टोरेज यांच्या मते, यांची प्रक्रिया म्हणजे मुलांनी रस दाखवला नाही तरी त्यांच्यापर्यंत प्रतिबंधित सामग्री पोहोचत आहे. जाहिरात महसुलावर परिणाम होण्याच्या शक्यतेने सुरक्षेचा अवलंब करण्यास मेटा तयार नव्हती. वस्तुत: टोरेज यांनी गुप्त चौकशी करून घेतली. याअंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेल्या छायाचित्रांचा वापर करत काल्पनिक किशाेरवयीन व मुलांचे अकाउंट तयार करण्यात आले. हे अकाउंट तयार होताच अल्गोरिदममुळे लैंगिक कंटेंट यायला लागले.
इतकेच नाही तर प्रौढांच्या संदेशांचा जणू पूर आला. न्यू मेक्सिकोच्या अल्बुकर्क शहरात 13 वर्षांच्या काल्पनिक किशोरवयीन मुलीचे फोटो असलेल्या अकाउंटमधून काही वेळेतच हजारो प्रौढ फॉलोअर जोडले गेले. फेसबुक मेसेंजरवर त्या काल्पनिक किशोरवयीन मुलीस आठवड्यातून तीन ते चारवेळा ग्राफिक व्हिडिओ आणि छायाचित्रे मिळायला लागली. त्यांचे प्लॅटफॉर्म तरुण युजर्सना किती गंभीर नुकसान पोहोचवू शकतात हे झुकरबर्ग आणि मेटाच्या इतर एक्झिक्युटिव्हना माहीत असल्याचा टोरेज यांचा दावा आहे. असे असतानाही मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी बदल करण्यात ते अपयशी ठरले आहेत.
दिवाळीला मथुरेच्या फटाका मार्केटला आग; 15 जण भाजले, 4 जणांची प्रकृती चिंताजनक; 12 दुचाकी जळाल्या
युरोपियन संघाने आधीच दिला अल्टिमेटम
युरोपियन संघाने (ईयू) इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषण सामग्रीचा सामना करण्यासाठी उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. यासाठी त्यांनी मेटाला २२ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. असे न झाल्यास ईयूच्या नव्या ऑनलाइन कन्टेंट नियमांतर्गत चौकशी केली जाईल.
Case Filed Against Meta CEO Mark Zuckerberg; Allegation that Facebook-Instagram is a haven for child exploitation
महत्वाच्या बातम्या
- नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारचे 3591.46 कोटी मंजूर; भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस पट्ट्याला लाभ!!
- नरसिंह रावांशी मधूर संबंधांवर प्रणवदांच्या डायरीतून “प्रकाश” आणि गांधी परिवाराची अंधारी बाजू उघड!!
- फडणवीसांचा अजितदादांना दणका; सुप्रिया सुळेंना नवाब मलिक यांचा कळवळा!!
- ओडिशा आणि झारखंडमध्ये बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर आयकर विभागाचे छापे