Thursday, 8 May 2025
  • Download App
    कार्बन उत्सर्जन पुन्हा पूर्वपदावर, आपल्या हातात केवळ ११ वर्षे असल्याचा शास्त्रज्ञांचा इशारा|Carbon emission increased in world once again

    कार्बन उत्सर्जन पुन्हा पूर्वपदावर, आपल्या हातात केवळ ११ वर्षे असल्याचा शास्त्रज्ञांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    ग्लास्गो – जगाचे व्यवहार पूर्वपदावर येत असताना कार्बनचे उत्सर्जनही जवळपास पूर्वपदावर आल्याने पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. उत्सर्जन वाढण्यात चीनचा मोठा वाटा असल्याचे शास्त्रज्ञांच्या एका गटाने म्हटले आहे.Carbon emission increased in world once again

    शास्त्रज्ञांचा हा गट हरीतगृह वायूंच्या उत्सर्जनाचा वारंवार आढावा घेत असतो. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, या वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्येच कार्बन उत्सर्जनाची पातळी २०१९ या वर्षीच्या पातळीच्या जवळपास गेली आहे.



    २०१९ मध्ये ३६.७ अब्ज टन कार्बन डाय ऑक्साईड हवेत उत्सर्जित झाला होता. या वर्षाअखेरीपर्यंत जवळपास इतकाच, म्हणजे ३६.४ अब्ज टन कार्बन डाय ऑक्साईड हवेत मिसळणार असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ३४.८ अब्ज टन इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४.९ टक्क्यांनी उत्सर्जन वाढले आहे.

    तापमानवाढीचे संकट समोर असतानाही बहुतेक देशांमध्ये पूर्वीप्रमाणेच कार्बनचे उत्सर्जन पुन्हा सुरु झाले असून यामध्ये सर्वाधिक वाटा चीनचा आहे. जगभरातील कार्बनचे उत्सर्जन मूळपदावर येण्यासही चीनच कारणीभूत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

    औद्योगिकीकरणपूर्व कालावधीच्या तुलनेत तापमानवाढ १.५ अंशांपर्यंत रोखायची असल्यास सध्याच्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणासह मानव केवळ आणखी ११ वर्षे सहन करण्यायोग्य वातावरणात राहू शकतो. यानंतर परिस्थिती बिकट होत जाईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

    Carbon emission increased in world once again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan PM : ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पंतप्रधानांचा जळफळाट- आम्ही बदला घेऊ; संसदेत 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा

    Donald Trump : ट्रम्प यांनी UNची 19 हजार कोटींची मदत रोखली; 3000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना

    Friedrich Mertz : फ्रेडरिक मेर्ट्झ यांची जर्मनीचे चान्सलर म्हणून निवड; दुसऱ्या फेरीच्या मतदानात 325 मते मिळाली