वृत्तसंस्था
ओटावा : स्थलांतरितांचे संकट हाताळण्यासाठी तसेच बनावट संस्थांवर आळा घालण्याच्या नावाखाली कॅनडाने पुढील दोन वर्षांसाठी स्टडी व्हिसामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. जस्टिन ट्रूडो सरकारचा हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तेथे शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या निर्णयाचे दूरगामी परिणााम होतील, असे मानले जाते.Canada visa cuts to 2 years, shock to Indian students; A major decision by the Trudeau government amid strained relations
कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर म्हणाले की, या निर्णयामुळे 2024 मध्ये 3.64 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. ते 2023च्या तुलनेत 35 टक्के कमी आहे. गेल्या वर्षी या श्रेणीतील 5.60 लाख व्हिसा जारी करण्यात आले होते. त्याच वेळी 2022 मध्ये आठ लाख विद्यार्थ्यांना तात्पुरता व्हिसा मिळाला. यामध्ये सर्वाधिक 3.19 लाख भारतीय विद्यार्थी होते.
2025 साठी निर्बंधांची संख्या या वर्षाच्या शेवटी निश्चित केली जाईल. मिलर म्हणाले, मर्यादा लादून फेडरल सरकार काही लहान खासगी महाविद्यालयांवर कारवाई करत आहे. ते योग्य सुविधा नसतानाही प्रवेश देतात. उल्लेखनीय म्हणजे खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर प्रकरणामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण आहेत.
Canada visa cuts to 2 years, shock to Indian students; A major decision by the Trudeau government amid strained relations
महत्वाच्या बातम्या
- कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर; केंद्राची घोषणा; दोन वेळा राहिले बिहारचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर; शेकडो रुग्णांना जीवदान
- राम मंदिराचे मुख्यमंत्री योगी यांनी केले हवाई निरीक्षण
- मीरा रोडच्या नया नगरमध्ये बुलडोझरची धडक कारवाई, दंगलखोरांची बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त!!