• Download App
    कॅमिला कॅबेलो, लिओनार्डो डिकॅप्रियो, लेडी गागा यांनी हवामान बदला वरील बिल पास करण्यासाठी अमेरीकन काँग्रेसकडे केली मागणी | Camila Cabello, Leonardo DiCaprio, Lady Gaga requests entertainment industry to demand action on climate change

    कॅमिला कॅबेलो, लिओनार्डो डिकॅप्रियो, लेडी गागा यांनी हवामान बदलावरील बिल पास करण्यासाठी अमेरीकन काँग्रेसकडे केली मागणी

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी एंटरटेन्मेंट इंडस्ट्री हॉलीवूडमधील कलाकारांनी एकत्र येऊन अमेरिकन कॉंग्रेसला हवामान बदल कायदा मंजूर करण्याची विनंती केली आहे. लिओनार्डो डि कॅप्रियो, लेडी गागा, कॅमिला कॅपेलो असे मोठमोठे कलाकार या इनिशिएटिव्ह मध्ये सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे 60 हून अधिक संगीतकार, अभिनेते, कलाकार यांचाही यामध्ये समावेश आहे.

    Camila Cabello, Leonardo DiCaprio, Lady Gaga requests entertainment industry to demand action on climate change

    द हॉलीवुड रिपोर्टच्या म्हणण्यानुसार, मोठमोठया कलाकारांनीही एकत्रित येऊन एनआरडीसी एक्शन फंड सोबत एकत्रित येऊन जगातील मोठमोठय़ा उद्योजकांना यासंबंधी पत्र देखील लिहिले आहे. वॉर्नर म्युझिक ग्रुपचे सीईओ लिंकन बेनेट, अँपल कंपनीचे सीईओ टिम कुक आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग इत्यादींना त्यांनी पत्र लिहिले आहे.


    INCREDIBLE INDIA : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीने हातावर गोंदवला सीता मातेचा टॅटू ; फोटो शेअर करत लिहिलं जय माँ…


    ‘बिल्ड बॅक बेटर’ हा जो बायडन यांनी सुरू केलेला अजेंडा आहे. या अजेंड्यामध्ये दोन बिल आहेत. 1 ट्रिलियन डॉलर्सचा द्विपक्षीय पायाभूत सुविधा प्रस्ताव आणि 3.5 ट्रिलियन डॉलर्सचे पॅकेज ज्यामध्ये हवामानात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी एक विशिष्ठ आणि कंट्रोल्ड औद्योगिक धोरण ठरवणे.

    सामान्य नागरिकांच्या मनावर मनोरंजन विश्वातील कलाकारांचा खूप मोठा प्रभाव असतो. आणि या प्रभावामुळे आजवर जगामध्ये अनेक मोठे बदल घडून आलेले आहेत. म्हणून एलेन डीजेनरेस, सेलेना गोमेज, जिमी फॅल, गोह किंग, दुआ लिपा, श्वान मेंडेस, सीन पेन, केरी वॉशिंग्टन या कलाकारांनी देखील या पत्रावर सह्या केलेल्या आहेत.

    Camila Cabello, Leonardo DiCaprio, Lady Gaga requests entertainment industry to demand action on climate change

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प इटलीच्या PM मेलोनींना भेटले; युरोपियन युनियनशी व्यापार कराराचे आश्वासन