महत्त्वाच्या बातम्या
लंडन – ब्रिटनमधील सर्व प्रौढांना ३१ जुलैपूर्वी लस देण्याचे येथील सरकारचे उद्दीष्ट्य वेळेआधी आजच पूर्ण झाले आहे. सरकारच्या या यशाबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आनंद व्यक्त केला आहे.Briton gave vaccine to all adult people
पंतप्रधान जॉन्सन यांनी ३१ जुलैपर्यंत देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक तरी डोस देण्याचे, तसेच १९ जुलैपर्यंत किमान दोन तृतियांश प्रौढांना दोन्ही डोस देण्याचे लक्ष्य आरोग्य यंत्रणेच्या समोर ठेवले होते. ही दोन्ही उद्दीष्ट्ये वेळेआधी साध्य झाली आहेत.
ब्रिटन सरकार आता सर्व निर्बंध उठविणार असून या ‘फ्रिडम डे’च्या पार्श्वभूमीवर मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात आहे. ब्रिटनमध्ये आठ महिन्यांपूर्वी लसीकरण मोहिम सुरु झाली होती. त्यानंतर अत्यंत नियोजनपूर्वक तिची अंमलबजावणी करण्यात आली. जॉन्सन यांनी जनतेचे आभार मानताना आता उर्वरित जणांनीही तातडीने लस घ्यावी, असे आवाहन केले आहे.
Briton gave vaccine to all adult people
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेस आता देशव्यापी पक्ष नाही, प्रादेशिक पक्षांनाच आता भाजपविरोधी दुसरी आघाडी तयार करावी लागेल, सुखबिरसिंग बादल यांचे आवाहन
- भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे, नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याने सोशल मीडियावर संताप
- पेगाससच्या तंत्रज्ञानामुळेच कोट्यवधी लोक रात्री झोपतोहेत निर्धास्त, एनएसओ कंपनीचा दावा
- अजित पवार म्हणाले वसुली करायला उपमुख्यमंत्री बनलोय का? नेटकरी म्हणाले तुम्ही त्यासाठी गृहमंत्री नेमले होते!