• Download App
    ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न|Britain's royal couple Prince Harry and Megan Markl blessed with baby

    ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न

    ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांच्या संसारात कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे.Britain’s royal couple Prince Harry and Megan Markl blessed with baby


    विशेष प्रतिनिधी

    लंडन : ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांच्या संसारात कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे.

    हॅरी आणि मेगन यांना शुक्रवारी कन्यारत्न प्राप्त झालं असून लिलिबेट लिली डायना असे या चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलं आहे. लिलिबेट हे महाराणीचं लोकप्रिय नाव आहे.



    डायना हे नाव प्रिन्स हेरी यांच्या आईच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. याबाबत माहिती होताच, जगभरातून शाही कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वांचे आभारही कुटुंबीयांकडून मानण्यात आले आहेत.

    हेरी आणि मर्केल यांना पहिला मुलगा असून त्याचे नाव आर्ची आहे. २०१८ मध्ये प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल लग्नबंधनात अडकले होते. हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्केल घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तिने प्रमुख भुमिका साकारली होती.

    त्यानंतर २०११ मध्ये तिने अमेरिकन निमार्ता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट २०१६ मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. त्यानंतर, हॅरीने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, तो मेगनने मान्य केला होता. प्रिन्स हॅरी ३३ वर्षांचे असून मेगन ३६ वर्षांची आहे.

    Britain’s royal couple Prince Harry and Megan Markl blessed with baby

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या