• Download App
    ब्रिटनचे सरकार पुन्हा कोसळले; लिझ ट्रस ठरल्या सव्वा महिन्यापुरत्या पंतप्रधान Britain's government collapsed again; Liz Truss became Prime Minister for a month and a half

    ब्रिटनचे सरकार पुन्हा कोसळले; लिझ ट्रस ठरल्या सव्वा महिन्यापुरत्या पंतप्रधान

    वृत्तसंस्था

    लंडन : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या अवघ्या सव्वा महिन्यापुरत्या पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान पद स्वीकारल्यापासून 45 दिवसांत ट्रस यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यामुळे ब्रिटनमधील सत्तानाट्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. ट्रस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली आहे. Britain’s government collapsed again; Liz Truss became Prime Minister for a month and a half

    नव्या पंतप्रधान पदासाठी शर्यत

    ब्रिटनमध्ये पक्षांतर्गत बंडखोरी वाढल्यामुळे ट्रस यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्याआधीच ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ब्रिटनमधील खासदार ऋषी सुनक यांचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. लिझ ट्रस यांच्याच वेळी ते स्पर्धेत होते. पण अवघ्या काही मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता.



    ट्रस यांची घोषणा

    ज्या आश्वासनांसाठी मी लढा देत होते ती आश्वासनं मी पूर्ण करू शकेन असे मला सध्याची परिस्थिती पाहता वाटत नाही. त्यामुळेच मी माझ्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देत आहे. ज्यावेळी मी या पदाचा कार्यभार हाती घेतला तेव्हा देशात आर्थिक स्थैर्य नव्हते. आम्ही देशातले कर कमी करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण ते सध्यातरी पूर्ण होईल असे वाटत नसल्यामुळे मी माझे पद सोडत आहे,अशी घोषणा लिझ ट्रस यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.

    Britain’s government collapsed again; Liz Truss became Prime Minister for a month and a half

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही