• Download App
    ब्रिटनने शाळांमध्ये मोबाइलवर घातली बंदी ; ऋषी सुनक म्हणाले, 'ही सर्वात मोठी समस्या'|Britain bans mobile phones in schools Rishi Sunak said This is the biggest problem

    ब्रिटनने शाळांमध्ये मोबाइलवर घातली बंदी ; ऋषी सुनक म्हणाले, ‘ही सर्वात मोठी समस्या’

    ब्रिटनच्या या निर्णयानंतर अनेक देशांमध्ये याची चर्चा सुरू झाली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    लंडन : मोबाईल फोनचे व्यसन आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांना कंटाळून ब्रिटनने शाळांमध्ये यावर बंदी घातली आहे. ब्रिटनच्या या निर्णयानंतर अनेक देशांमध्ये याची चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून याची घोषणा केली आहे.Britain bans mobile phones in schools Rishi Sunak said This is the biggest problem

    ऋषी सुनक यांनी एक अतिशय क्रिएटिव्ह व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांचा फोन पुन्हा पुन्हा वाजत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ऋषी सुनक यांनी व्हिडीओच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मोबाईल फोनमुळे वर्गात कशा समस्या निर्माण होत आहेत.



    व्हिडिओमध्ये दिसत आहे की ते पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करत आहेत पण मध्येच त्यांचा फोन वाजतो आहे. फोन तीन वेळा वाजल्यानंतर, ऋषी सुनक खिशातून फोन काढतात आणि बाजूला ठेवतात व म्हणतात बघा किती निराशाजनक आहे.

    दुसऱ्या एका निवेदनात सुनक म्हणाले की, माध्यमिक शाळेतील सुमारे एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी सांगितले की फोनमुळे त्यांचा अभ्यास विस्कळीत झाला आहे. आम्हाला माहित आहे की मोबाइल फोन वर्गात लक्ष विचलित करतात आणि शाळांमध्ये खटाळ्यापणाचे कारण ठरतात.

    अनेक शाळांनी त्याच्यावर आधीच बंदी घातली आहे, ज्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि चांगले शिक्षण वातावरण निर्माण झाले आहे. शाळांमध्ये मोबाईल बंदीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. पंतप्रधान सुनक म्हणतात की आमच्या मुलांना योग्य शिक्षण मिळावे याची आम्ही खात्री करत आहोत.

    Britain bans mobile phones in schools Rishi Sunak said This is the biggest problem

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या