• Download App
    Peter Navarro भारतापाठोपाठ अमेरिकेत देखील जाती द्वेषाची लागण; ट्रम्पच्या व्यापार सल्लागाराचे ब्राह्मणांविरुद्ध तोंडसुख!!

    भारतापाठोपाठ अमेरिकेत देखील जाती द्वेषाची लागण; ट्रम्पच्या व्यापार सल्लागाराचे ब्राह्मणांविरुद्ध तोंडसुख!!

    नाशिक : महाराष्ट्रात आणि देशात जशी जाती द्वेषाची लागण होऊन वेगवेगळी आंदोलने उभी राहिली, तशीच जाती द्वेषाची लागण अमेरिकेत झाली असून तिने ट्रम्प प्रशासनाला घेरून टाकल्याचे दिसून आले‌. त्यातूनच ट्रम्पचा व्यापार सल्लागाराने ब्राह्मणांविरुद्ध तोंडसुख घेतले!! रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध हे “मोदी युद्ध” आहे, असा “जावईशोध” लावणारे ट्रम्प प्रशासनाचे व्यापार सल्लागार पीटर नावारो यांनी आता मोदी युद्धाच्या पलीकडचा नवा “जावईशोध” लावला आहे. रशियाकडून तेल खरेदी करून ते जगाला विकण्यात भारतातले ब्राह्मण पुढे आहेत. ब्राह्मण रशियन तेलातून फायदा कमवत आहेत आणि त्याची किंमत भारतीय जनतेला चुकवावी लागत आहे, असा दावा पीटर नावारो यांनी केला. त्यामुळे अमेरिकेसह भारतात नव्या वादाला तोंड फुटले. Peter Navarro

    – नवा अर्बन नक्षली

    जाती द्वेषाने पछाडून भारतात वेगवेगळे आंदोलने उभी राहिली. त्या आंदोलनांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वसामान्य जनतेला वेठीला धरले. अर्बन नक्षल्यांनी जाती द्वेषाच्या आंदोलनांना वैचारिक खतपाणी घातले. त्यांचे वैचारिक भरण पोषण केले. त्यात अमेरिकेतल्या deep state ने कोट्यवधी डॉलर्स ओतले. भारतात अराजक फैलावायचे डाव खेळले. पण आत्तापर्यंत deep state ला त्यासाठी दूषणे देणाऱ्या ट्रम्प प्रशासनालाच जाती द्वेषाची लागण झाली. त्यातूनच पीटर नावारो यांनी ब्राह्मणांवर तोंडसुख घेतले.

    – पुरावे न देताच आरोप

    रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाले नव्हते, तोपर्यंत भारत रशियाकडून सध्या घेतो. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तेल घेत नव्हता. पण रशियाने युक्रेनवर हल्ले करायला सुरुवात केल्याबरोबर रशियाला करोडो डॉलर्सची मदत व्हावी यासाठी भारताने रशियाकडून तेल घ्यायचे प्रमाण वाढविले. युक्रेन विरुद्धच्या युद्धात भारताने रशियाला मदत केली. भारतातल्या व्यापाऱ्यांनी रशियन तेल जगातल्या इतर देशांना विकायला सुरुवात केली. या सगळ्यांमध्ये तेलाच्या व्यवहारात भारतातल्या ब्राह्मणांनी फायदा करून घेतला पण त्याची किंमत इतर भारतीयांना चुकवावी लागली, असे अजब वक्तव्य पीटर नावारो यांनी केले. मात्र या वक्तव्यासाठी त्यांनी कुठलाही पुरावा दिला नाही. रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध हे “मोदी युद्ध” आहे, अशा बेछूट आरोपाप्रमाणेच रशियन तेलाचा ब्राह्मणांना फायदा होतो असा दुसरा बेछूट आरोप करून ते मोकळे झाले. भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या आंदोलनाचे वेगळे प्रतिबिंब अमेरिकेत उमटले.

    नावारो फक्त ब्राह्मण द्वेषी वक्तव्य करून थांबले नाहीत त्यांनी भारतातल्या लोकशाहीला देखील दूषणे दिली. रशिया आणि चीन यांच्यात कम्युनिस्टांचा एकछत्री अंमल असताना भारतासारखी मोठी लोकशाही त्या दोन देशांच्या कच्छपी कशी काय लागू शकते??, असा सवाल करून नावारो यांनी शीतयुद्धाची मानसिकता प्रकट केली.

    Brahmins are profiteering in India,” says Trump’s trade adviser Peter Navarro

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवारांची लवकरच दिल्ली वारी, काँग्रेसच्या दरबारी करणार मनसेची वकिली!!

    US-Russia : ट्रम्प-पुतिन अधिकाऱ्यांमधील गुप्त बैठकीवरून वाद; युक्रेन युद्ध संपवण्याची योजना येथेच रचल्याचा दावा

    अजितदादांच्या पुणे जिल्ह्यात भाजपचा स्वबळाचा तडाखा; म्हणून शरद पवारांचा पक्ष अजितदादांना लागला फोडावा!!