विशेष प्रतिनिधी
पेशावर – लाहोर किल्ल्याजवळ उभारलेल्या महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याबद्दल येथील शीख समुदायाने संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाला पुतळ्याचे संरक्षण करता येत नसेल तर आम्ही तो पुतळा पेशावरमध्ये घेऊन येतो, अशी प्रतिक्रिया शीख नागरिकांनी दिली आहे.
पाकिस्तानमधील तेहरीके लब्बैक पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने काल महाराजा रणजितसिंग यांच्या नऊ फुटी उंच ब्राँझच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराजा रणजितसिंग यांचा लाहोरमधील पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ भाजपने पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर जोरदार निदर्शने केली. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व भाजप पदाधिकारी या निदर्शनांत सहभागी झाले.
यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. महाराजा रणजितसिंग यांच्या लाहोर किल्ल्यातील पुतळ्याची अनेकदा विटंबना करण्यात आली व पाकिस्तान सरकारने तो पुन्हा तेथे बसविला. याआधी लाहोरच्या माई जिंदा हवेलीतील पुतळ्यांचीही पाकिस्तानातील धार्मिक कट्टरतावाद्यांनी विटंबना केली होती.
महत्वाच्या बातम्या
- अफगणिस्थानमधील पराभवाचे खापर ज्यो बायडेन यांच्यावर, अमेरिकेतील लोकप्रियता सात टक्यांनी घटली
- मुलगा व्हावा म्हणून पत्नीचा आठ वेळा गर्भपात, स्टेरॉईडसची दीड हजार इंजेक्शन, निवृत्त न्यायाधिशांच्या मुलीने केली पोलीसांत तक्रार
- नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्य प्रदेशला भेट, ३५ दिवसांत नवीन उड्डाणे सुरू
- हरियाणा सरकारने घातली गौरखधंदा शब्दावर बंदी, संत गोरखनाथ यांच्या अनुयायांच्या भावना दुखू नये म्हणून निर्णय