विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका अब्जाधिशाची विकृती समोर आली आहे. त्याने तब्बल पाच हजार महिलांशी शरीरसंबंध ठेवले होतेच, पण त्यांच्या नावांची यादीही त्याने स्प्रेडशिटवर तयार केली आहे. या अब्जाधिशावर यापूर्वीही लैंगिक छळवणुकीचे आरोप झालेले आहेत.Billionaire perversion, having sex with five thousand women and even compiling a list of names
57 वर्षांचे मायकल गोगुएनवर त्यांच्याच चार माजी कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या माजी कर्मचाऱ्यांनी 135 पानी रिपोर्टनुसार माइकलवर आरोप केले आहेत. तो अनेक आलिशान आणि गुप्त घरांचा मालक आहे. तो कथित रुपात तरुणींसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी घेऊन जात होता.
त्याच्या बारच्या बेसमेंटमध्ये एक विचित्र खोलीदेखील आहे. ज्यात एक स्ट्रिपर पोल आहे. अमेरिकेतील मोंटाना राज्यातील त्याच्या व्हाईटफिशच्या घरी तो सध्या राहतो. त्याने आतापर्यंत 5000 महिलांसह शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोपही केला जात आहे.
मॅथ्यू मार्शल नावाच्या एका माजी कर्मचाऱ्याने दावा केला की मायकेलने त्याला त्याचा माजी मित्र ब्रायन नॅशची हत्या करण्यास सांगितले. कारण त्याला त्याच्याबद्दल बरंच काही माहीत होतं. मायकेलवर लैंगिक शोषणाचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याची माजी प्रेयसी अंबर बॅप्टिस्ट, एक परदेशी नृत्यांगना, हिने 2016 मध्ये वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.
Billionaire perversion, having sex with five thousand women and even compiling a list of names
महत्त्वाच्या बातम्या
- राफेलची गर्जना, भारतीय शस्त्रास्त्र बसविण्याचे काम सुरू होणार
- एमआयएम चा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शंभर जागा लढवणार
- बेजबाबदार वर्चस्ववादी देश सागरी सुरक्षेची स्वार्थी व्याख्या करतात; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा चीनवर हल्लाबोल!!
- माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर सोलापुरात एका मेळाव्यात तरुणाने फेकले काळे ऑईल