विशेष प्रतिनिधी
अमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेझोस आणि स्पेस एक्स कंपनीचे मालक एलॉन मस्क हे दोघेही सध्या अंतराळ संशोधनावर बरेच पैसे इन्व्हेस्ट करताना दिसून येत आहेत. यावर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी आपली खोचक प्रतिक्रिया एका इंटरव्ह्यूदरम्यान दिली आहे.
Bill gates has a message for Jeff bezos and elon musk! Focus on earth’s problems instead of space research
द लेट लेट शो विथ जेम्स कॉर्डन या शोमध्ये बोलताना बिल गेट्स म्हणाले की, सध्याची पर्यावरणाची बिकट स्थिती पाहता, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मलेरिया, एचआयव्ही, कोरोणा असे बरेच रोग सध्या धुमाकूळ घालताना दिसून येतायत. मानवजातीला यामुळे खूप मोठे नुकसान होताना दिसून येत आहे. अशावेळी स्पेसमध्ये पैसे गुंतवून करण्यापेक्षा या रोगांचा नायनाट करण्यावर मी जास्त भर देईन. असे म्हणत त्यांनी जेफ बेझोस आणि इलॉन मस्क यांच्या अंतराळ संशोधनातील मोहिमेला इनडायरेक्टली क्रिटिसाइज केले आहे.
बिल गेट्स एलॉन मस्क यांना क्रिटिसाइज करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी फेब्रुवारीमध्ये देखील एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी इलॉन मस्क यांना निशाणा साधताना म्हटले होते की, इलॉन मस्क यांनी पर्यावरण बदलांसाठी केलेली मदत ही वाखाणण्याजोगी आहे पण ही मदत वास्तववादी नाहीये.
बेझोस यांची ब्लू ओरिजिन ही कंपनी आणि मस्क यांची स्पेस एक्स कंपनी सध्या अंतराळ संशोधनामध्ये काम करत आहेत. स्पेसएक्स कंपनीद्वारे नुकताच चार सामान्य नागरिकांना पृथ्वीच्या ऑर्बिट बाहेर तीन दिवसांसाठी पाठवण्यात आले होते. या मिशनला इन्स्पिरेशन फोर हे नाव दिले होते.
Bill gates has a message for Jeff bezos and elon musk! Focus on earth’s problems instead of space research
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेतून परतल्यावर पंतप्रधान मोदी थेट पोचले विस्टा प्रोजेक्ट पाहायला; एक तास घेतला आढावा
- “भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा जलसमाधी”; अयोध्येतील धर्मसंसदेत संत परमहंस यांची घोषणा
- महाराष्ट्र व गुजरातला परतीचा पाऊस झोडपणार, आज, उद्या मुसळधार कोसळणार; शास्त्रज्ञाचा इशारा
- SARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी ! यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट