• Download App
    Colombia मोठी बातमी! कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या

    Colombia : मोठी बातमी! कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला

    Colombia

    रॅलीला संबोधित करताना झाडल्या गोळ्या; आरोपीला अटक


    विशेष प्रतिनिधी

    बोगोटा – Colombia  कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी बोगोटा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना एका व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच ते जमिनीवर कोसळे, त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ट्रम्प प्रशासनाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.Colombia

    शनिवारी कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये गोंधळ उडाला होता. विरोधी डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे प्रमुख नेते आणि २०२६ च्या राष्ट्रपती निवडणुकीचे उमेदवार मिगुएल उरीबे टर्बे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला. एका रॅलीला संबोधित करताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.



    प्रत्यक्षदर्शींच्या मते, गोळी लागताच मिगुएल जमिनीवर कोसळे. घटनास्थळी तैनात असलेल्या त्यांच्या समर्थकांनी आणि पोलिसांनी त्यांना ताबडतोब उचलून रुग्णवाहिकेत नेले. कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की एका संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. या हल्ल्यात आणखी कोणी सहभागी होते का हा देखील तपासाचा विषय आहे.

    Big news Presidential candidate attacked in Colombia

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Israel Syria Attack : इस्रायलच्या सीरियावरील हल्ल्यामुळे ट्रम्प नाराज; अहवालात दावा- व्हाइट हाऊसने म्हटले- नेतन्याहू वेडे झालेत

    Canada : कॅनडात कपिलचा कॅफे पुन्हा सुरू; उद्घाटनानंतर फक्त 2 दिवसांनी गोळीबार, खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धमक्या

    Dhaka : ढाकात बांगलादेश वायूदलाचे मेड इन चायना विमान शाळेवर कोसळले; पायलटसह 19 ठार, 164 जखमी