विशेष प्रतिनिधी
लखनौ – भाजपच्या हिंदू-मुस्लिम राजकारणापासून सावध राहा. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी हीच या पक्षाची शेवटची रणनीती आहे, असा सल्ला बसप प्रमुख मायावती यांनी जनतेला दिला.Beware of BJP’s Hindu-Muslim politics – Mayawati
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अयोध्या व काशीतील मंदिरांची काम सुरू असून मथुरेतील मंदिराची पूर्वतयारी सुरू आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर मायावती यांनी प्रतिक्रिया दिली.
त्या म्हणाल्या, की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौर्य यांचे वक्तव्य भाजपचा पराभव होण्याचा समज दृढ करणारे आहे. भाजपच्या हिंदू-मुस्लिम राजकारणाच्या शेवटच्या रणनीतीपासून जनतेने सावध राहायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही मौर्य यांच्या वक्तव्यातून भाजपला पराभवाची चाहूल लागल्याची टीका केली होती. मथुरा हे श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे. अखिल भारत हिंदू महासभेने श्रीकृष्णाची मूर्ती मथुरेत उभारण्याची घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने २८ नोव्हेंबरला जमावबंदीचे कलम लागू केले.
Beware of BJP’s Hindu-Muslim politics – Mayawati
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिका, नायजेरियातही ओमिक्रॉन , आफ्रिकेत चोवीस तासात रुग्ण दुप्पटीने वाढले
- अमेरिकेतही झिंगाट? कोलोरॅडो मधील चित्रपट गृहात भारतीयांनी सैराट सिनेमातील झिंगाट गाण्यावर केलेला डान्स पाहिला का?
- गांधीनगर नाही तर मुंबईच देशाची आर्थिक राजधानी राहणार ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
- ममता – पवारांनी काँग्रेसला घेरल्यानंतर कपिल सिब्बल उभे राहिले पक्षाच्या बाजूने!!