विशेष प्रतिनिधी
लंडन – कोरोना कालावधीनंतर ब्रिटनच्या संसदेचे कामकाज लोकप्रतिनिधींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सुरु झाले. संसदेत उपस्थितीत राहताना सदस्यांनी योग्य पोशाखातच हजर रहावे, अशा स्पष्ट सूचना लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांनी दिल्या आहेत.Behave nicely in parliament tells British MP
सदस्यांनी आपला पोशाख आणि भाषा यांच्याकडे लक्ष देतानाच इतर सदस्य, संसद आणि देशाबद्दल आदराची भावना राखायला हवी, असे त्यांनी सांगितले आहे. ‘टी शर्ट -जीन्स हा संसदेसाठी योग्य पोशाख नाही. पायात बिझनेस शूज असावेत. स्लीव्हलेस कपडे नको. कोट आणि टाय असावा,’ अशी यादीच हॉयल यांनी दिली आहे.
कोरोना कालावधीत अनेक सदस्य आपल्या घरूनच ऑनलाइन माध्यमातून कामकाजात सहभागी होत होते. यावेळी नियमांमध्ये सवलत दिली गेल्याने काही सदस्य जीन्स, टी-शर्ट किंवा घरात घालायचे कपडे घालून कॅमेरासमोर बसत होते.
तसेच, त्यांच्या वागण्या-बोलण्यातही फारसे गांभीर्य दिसत नव्हते.संसदेत कामकाजादरम्यान एखाद्या सदस्याचे भाषण सुरु असताना इतरांनी त्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकावे; पुस्तक, वर्तमानपत्र वाचू नये, मोबाईलशी खेळू नये, अशा सूचनाही हॉयल यांनी दिल्या आहेत.
Behave nicely in parliament tells British MP
महत्त्वाच्या बातम्या
- पवारांनी कुठे पाठीत खंजीर खुपसला दाखवा?, असे म्हणणाऱ्या संजय राऊतांना चंद्रकांतदादांचा “या” अभ्यासाचा सल्ला
- Bengal By-Poll : ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवणार, टीएमसीची घोषणा- ‘भाजपने उमेदवार उभे करून पैसे वाया घालवू नये’
- Farmers Protest : राकेश टिकैत यांच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांचा पलटवार, म्हणाले- सरकारने 11 वेळा चर्चा केली, काही जण भ्रम पसरवत आहेत
- आता बिहार काँग्रेसमध्ये गदारोळ, हायकमांडने नवीन जम्बो टीमची घोषणा थांबवली, अहवाल वाचा