• Download App
    Bangladesh पाकिस्तानसाठी बांगलादेशच्या पायघड्या, पाक नागरिक

    Bangladesh : पाकिस्तानसाठी बांगलादेशच्या पायघड्या, पाक नागरिक आता सुरक्षा परवानगीशिवाय देशात प्रवेश करू शकणार

    Bangladesh

    वृत्तसंस्था

    ढाका : Bangladesh  पाकिस्तानी नागरिक आता सुरक्षेच्या परवानगीशिवायही बांगलादेशात प्रवेश करू शकणार आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी सुरक्षा मंजुरीची अट रद्द केली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशच्या गृह मंत्रालयाच्या सुरक्षा सेवा विभागाने (एसएसडी) परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत माहिती दिली.Bangladesh

    2019 पासून, पाकिस्तानी नागरिकांना बांगलादेशी व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी SSD कडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. त्याचबरोबर बांगलादेशसाठी भारतीय नागरिकांना दिल्या जाणाऱ्या व्हिसाच्या संख्येतही घट झाली आहे. ढाकाने याबाबत बांगलादेशच्या कोलकाता मिशनला आदेश पाठवला आहे.



    बांगलादेशशी संबंध कसे वाढवायचे हे भारताला समजेल

    भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधात तणाव सातत्याने वाढत आहे. बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनीही हा बदल मान्य केला. ते म्हणाले- 5 ऑगस्टनंतर भारतासोबतच्या संबंधांमध्ये बदल झाला आणि हे वास्तव आहे. मला विश्वास आहे की, बदललेल्या परिस्थितीत बांगलादेशशी संबंध कसे पुढे न्यावेत हे भारताला समजेल.

    मोहम्मद युनूस यांचे सरकार पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यातच पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात थेट सागरी संपर्क सुरू झाला. त्यानंतर कराची, पाकिस्तान येथून एक मालवाहू जहाज बंगालच्या उपसागरातून बांगलादेशातील चितगाव बंदरात पोहोचले.

    बांगलादेशी कमिशनमध्ये तोडफोड प्रकरणी 7 जणांना अटक

    गुरुवारी युनूस सरकारने कोलकाता आणि त्रिपुरातून आपल्या 2 राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. 2 डिसेंबर रोजी आगरतळा येथील बांगलादेश उप उच्चायुक्तालयात तोडफोड झाल्याच्या घटनेमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

    दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यालाही बोलावले होते. त्रिपुरा पोलिसांनी स्वत:हून गुन्हा नोंदवला आणि बांगलादेश मिशनमध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेत सहभागी असलेल्या सात जणांना अटक केली.

    Bangladesh’s footsteps for Pakistan, Pakistani citizens will now be able to enter the country without security permission

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप

    Pakistan PM : ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पंतप्रधानांचा जळफळाट- आम्ही बदला घेऊ; संसदेत 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा