• Download App
    Bangladesh Slum Fire Dhaka Korail 1500 Homes Photos Videos Report बांगलादेशात सर्वात मोठ्या झोपडपट्टीला आग; 1500 घरे जळून राख; हजारो लोक बेघर

    Bangladesh : बांगलादेशात सर्वात मोठ्या झोपडपट्टीला आग; 1500 घरे जळून राख; हजारो लोक बेघर

    Bangladesh

    वृत्तसंस्था

    ढाका : Bangladesh बांगलादेशची राजधानी ढाका येथील सर्वात मोठ्या कोराइल झोपडपट्टीत मंगळवारी संध्याकाळी आग लागली, ज्यात 1500 हून अधिक घरे जळून खाक झाली. यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. तर, गर्भवती महिला आणि मुलांसह अनेकांनी थंडीत रात्र काढली.Bangladesh

    अग्निशमन दलाचे अधिकारी राशेद बिन खालिद यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी लागलेल्या आगीवर बुधवारी दुपारनंतर नियंत्रण मिळवण्यात आले. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी 16 तासांपेक्षा जास्त वेळ लागला.Bangladesh

    ढाका ट्रिब्यूननुसार, ही आग स्वयंपाक करताना सिलेंडर फुटल्याने लागली होती. वस्ती अरुंद असल्यामुळे आग वेगाने एका घरातून दुसऱ्या घरात पसरली. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाची वाहने आतपर्यंत पोहोचू शकली नाहीत.Bangladesh



    यामुळे आग विझवण्यात उशीर झाला. कोराइल वस्ती 160 एकरमध्ये पसरलेली आहे. येथे सुमारे 80 हजार लोक राहतात. जखमी आणि मृतांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    पीडित म्हणाले- डोळ्यासमोर सर्व काही जळून खाक झाले

    कोराइल झोपडपट्टीत यापूर्वी 2017 मध्येही भीषण आग लागली होती. स्थानिक जहानारा बीबी रडत म्हणाल्या, “पुन्हा सर्व काही संपले. माझ्या पतीचे छोटेसे खाण्याचे दुकानही जळून खाक झाले.”

    आणखी एक पीडित अलीमने सांगितले, “माझ्या डोळ्यासमोर सर्व काही जळून खाक झाले. मी काहीही करू शकलो नाही. आता पुढे काय करावे हेही सुचत नाहीये.” येथे लोक रात्रभर आपल्या जळालेल्या झोपडीसमोर कुटुंबासोबत उघड्या आकाशाखाली थंडीत बसून राहिले.

    येथे मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. ढाका महानगर उत्तर समिती अन्न वाटप करत आहे. जमात-ए-इस्लामी आणि आलो हेल्थ क्लिनिकने औषधे आणि उपचार पुरवले. अनेक गर्भवती महिलांना रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यापैकी एका महिलेने गुरुवारी सकाळी बाळाला जन्म दिला आहे.

    Bangladesh Slum Fire Dhaka Korail 1500 Homes Photos Videos Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan : पाकिस्तान बांगलादेशात 40 हैदर रणगाडे बनवून देणार:अब्दाली क्षेपणास्त्र क्षमता 180 किमी

    Imran Khan : सोशल मीडियावर इम्रान खानच्या मृत्यूची अफवा; पाक सरकार शांत, बहिणींनी सांगितले- भेटू दिले जात नाही

    Brazil : ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना 27 वर्षांची शिक्षा; निवडणुकीतील पराभवानंतर सत्तापालटाचा कट रचला होता