• Download App
    ऑस्ट्रेलियाचा कुरापतखोर चीनला दणका, दोन करार केले रद्द Australia slams China, cancels two agreements

    ऑस्ट्रेलियाचा कुरापतखोर चीनला दणका, दोन करार केले रद्द

    जगभरातील अनेक देशांशी सातत्याने कुरापती काढणाऱ्या  चीनची चांगलीच नाचक्की झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सुरक्षितेच्या मुद्यावर चीनसाठी महत्त्वकांक्षी असलेल्या बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्हचे दोन करार रद्द केले आहे. 


    विशेष प्रतिनिधी

    कॅनबेरा: जगभरातील अनेक देशांशी सातत्याने कुरापती काढणाऱ्या चीनची चांगलीच नाचक्की झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सुरक्षितेच्या मुद्यावर चीनसाठी महत्त्वकांक्षी असलेल्या बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्हचे दोन करार रद्द केले आहे. Australia slams China, cancels two agreements

    या करारानुसार चिनी कंपन्या ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतात इमारती व पायाभूत सुविधा तयार करणार होत्या. हा करार व्हिक्टोरिया राज्याने चीनसोबत केला होता. आता प्रांतीय सरकारचा करार रद्द करण्याची भूमिका ऑस्ट्रेलियन सरकारने घेतली. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पायने यांनी म्हटले की, चीनसोबत २०१८ आणि २०१९ मध्ये हा करार करण्यात आला. आम्ही नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार, चीनच्या या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.



    ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र धोरणाशी हा करार योग्य नाही. आमचे परराष्ट्र संबंध सध्या प्रतिकूल आहे. चीनने ऑस्ट्रेलियासोबत तणाव वाढल्यानंतर सहकायार्चे संबंध बाधित करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही चीनला धडा शिकवण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले.

    ऑस्ट्रेलियाने वर्ष २०१८ मध्ये एक नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर केला होता. त्यानुसार देशांतर्गत धोरणात गुप्तपणे सुरू असलेल्या परदेशी हस्तक्षेपाला अटकाव घालतो. चीनने या कायद्यावर नाराजी व्यक्त केली होती. हा कायदा चीनबद्दल पूर्वग्रहदूषित करणारा आणि दोन्ही देशांमधील संबंधात विष कालवणारा ठरणार असल्याचे चीनने म्हटले होते.

    हाँगकाँगच्या मुद्यावर दोन्ही देशांमध्ये मतभेद आहे. चीनने हाँगकाँगमध्ये नवीन सुरक्षा कायदा अंमलात आणल्यानंतर ऑस्ट्रेलियाने हाँगकाँगसोबतचा प्रत्यार्पण करार रद्द केला होता. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाने हाँगकाँगच्या नागरिकांना आपल्या देशात वास्तव्य करण्यासाठी आणि व्हिसा मुदत वाढ देण्याची ऑफर दिली होती.

    Australia slams China, cancels two agreements

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या