Australia Melbourne Earthquake : ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न शहर बुधवारी शक्तिशाली भूकंपामुळे हादरले. 5.9 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अनेक इमारती हादरल्या आणि भिंती कोसळल्या. अचानक झालेल्या भूकंपामुळे स्थानिक लोकांमध्ये भीती पसरली आणि ते घराबाहेर पडले. ऑस्ट्रेलियाचे दुसरे सर्वात मोठे शहर असलेले मेलबर्न सकाळी 9 वाजता (स्थानिक वेळेनुसार) भूकंपामुळे हादरले. australia melbourne Earthquake 6 magnitude powerful earthquake rubble falls from buildings
वृत्तसंस्था
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न शहर बुधवारी शक्तिशाली भूकंपामुळे हादरले. 5.9 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अनेक इमारती हादरल्या आणि भिंती कोसळल्या. अचानक झालेल्या भूकंपामुळे स्थानिक लोकांमध्ये भीती पसरली आणि ते घराबाहेर पडले. ऑस्ट्रेलियाचे दुसरे सर्वात मोठे शहर असलेले मेलबर्न सकाळी 9 वाजता (स्थानिक वेळेनुसार) भूकंपामुळे हादरले.
भूकंप एवढा जबरदस्त होता की, शेकडो किलोमीटर दूरपर्यंत जाणवला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने आधी त्याची तीव्रता 5.8 नोंदवली होती, जी नंतर 5.9 झाली. माहितीनुसार, त्याची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती.
रस्त्यावर ढिगारा
शक्तिशाली भूकंपानंतर मेलबर्नच्या चॅपल स्ट्रीटवर ढिगारा पसरला. हा परिसर येथील लोकप्रिय खरेदी क्षेत्र आहे. रस्त्यांवरील इमारतींमधून विटा आणि दगड पडू लागले. मेलबर्नमधील एका कॅफेचे मालक जुम फिम यांनी सांगितले की भूकंप होताच ते बाहेर पडले आणि रस्त्याच्या दिशेने पळाला. संपूर्ण इमारत थरथर कापत होती. सर्व खिडक्या, आरसे थरथरत होते – जणू एक शक्तिशाली लाट येत होती. फिम म्हणाले, ‘मला यापूर्वी असे कधी वाटले नव्हते. ते भीतिदायक होते.’
मेलबर्नमध्ये भूकंप दुर्मिळ
ऑस्ट्रेलियाचा आग्नेय भाग भूकंपासाठी ओळखला जात नाही. या भागात भूकंप अत्यंत दुर्मिळ आहेत. 800च्या दशकात येथे एक शक्तिशाली भूकंप झाला होता, त्यानंतर कोणत्याही मोठ्या भूकंपामुळे येथे नुकसान झाले नाही. 10 ते 20 वर्षांत एकदा भूकंप होतो. 2012 मध्ये अखेरच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवले होते.
australia melbourne Earthquake 6 magnitude powerful earthquake rubble falls from buildings
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात विविध विषयांवर चर्चा; कोरोना वैश्विक शिखर संमेलनातही भाग घेणार
- सामनाच्या कार्यकारींना चंद्रकांत दादांचे प्रोटोकॉल तोडून प्रत्युत्तर…!! प्रवक्ते शिवसेनेचे की पवारांचे…??
- रस्ते अपघात टाळण्यासाठी गाड्यांमध्ये सेन्सर्स, चालकाची कामाची वेळही आता निश्चित करणार
- राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे निलंबित १२ आमदार चक्क करणार विधान भवनाबाहेरून मतदान
- तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ‘नीट’ परीक्षा रद्द करा; बारावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश देण्याची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी