कॅनबेरा – पर्यावरण बदलामुळे दिवसेंदिवस संवेदनशील होत चाललेल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रवाळ बेटांचा दर्जा घटविण्याची शिफारस संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक वारसा समितीने केली असून या प्रयत्नांना विरोध करणार असल्याचे ऑस्ट्रेलिया सरकारने म्हटले आहे.Aus. Govt. opposes UNESCO
या प्रवाळ बेटांचा (ग्रेट बॅरियर रिफ) सध्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश आहे. मात्र, आता त्यांचा समावेश धोकादायक जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर रंगीबेरंगी प्रवाळ बेटे आहेत. पर्यावरण बदलामुळे हा बेटांना मोठी हानी पोहोचत असून येथील परिसंस्थाही धोक्यात आली आहे. त्यामुळेच त्यांचे जतन करण्यासाठी ऑस्ट्रेलियावर काही प्रमाणात निर्बंध लादण्याचा वारसा समितीचा विचार आहे.
ऑस्ट्रेलियाचा मात्र वारसा समितीच्या या शिफारशींना विरोध आहे. प्रवाळ बेटांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ असल्याचा त्यांचा दावा आहे. धोकादायक जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सध्या ५३ वारसा स्थळे आहेत.
समितीची निरीक्षणे चुकीची असून अजूनही प्रवाळ बेटे तितकीच रंगीबेरंगी आहेत, असा दावा ऑस्ट्रेलिया सरकारने केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात हे आंतरराष्ट्रीय राजकारण होत असल्याचा आरोपही सरकारने केला आहे.
Aus. Govt. opposes UNESCO
महत्त्वाच्या बातम्या
- स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साइट Koo वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एंट्री, यापूर्वी अनेक केंद्रीय मंत्र्यांचेही Koo वर खाते
- Oxfam Report : ऑक्सफॅमचा धक्कादायक अहवाल, जगात दर मिनिटाला 11 जणांचा उपासमारीमुळे मृत्यू
- देवेंद्र फडणवीसांच्या एका पत्रामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याची गच्छंती; जाणून घ्या कोण आहेत राजकुमार ढाकणे?