• Download App
    बांगलादेशात हिंदूंवर हल्ला : पैगंबरांवर कथित अपमानास्पद पोस्टमुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी हिंदूंची घरे आणि मंदिर पेटवले|Attacks on Hindus in Bangladesh: Hindu houses and temples set ablaze by fanatics angered by posts allegedly insulting the Prophet

    बांगलादेशात हिंदूंवर हल्ला : पैगंबरांवर कथित अपमानास्पद पोस्टमुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी हिंदूंची घरे आणि मंदिर पेटवले

    वृत्तसंस्था

    ढाका : बांगलादेशात, नरेलमधील लोहाग्रा येथे शुक्रवारी धर्मांधांच्या जमावाने हिंदूंच्या घरांवर आणि मंदिरावर हल्ला केला. एका हिंदू मुलाने पैगंबरांवर केलेल्या कथित अपमानास्पद पोस्टमुळे हे लोक संतापले होते. या हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.Attacks on Hindus in Bangladesh: Hindu houses and temples set ablaze by fanatics angered by posts allegedly insulting the Prophet

    पोलीस निरीक्षक हरन चंद्र पॉल यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी दिघोलिया गावात अनेक हिंदू घरांची तोडफोड करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. सायंकाळी 7.30 च्या सुमारास हल्लेखोरांनी हिंदूंच्या घरांवर हल्ला केला.



    फेसबुक पोस्ट करणाऱ्याला अटक

    स्थानिकांनी फेसबुक पोस्ट अपलोड करणाऱ्या तरुणाची ओळख सहापारा येथील अशोक साहा यांचा मुलगा आकाश साहा अशी केली. दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप एकाही हल्लेखोराला अटक करण्यात आलेली नाही.

    नरेलचे पोलीस अधीक्षक प्रबीर कुमार रॉय यांनी सांगितले की, आम्ही घटनेचा तपास करत आहोत. हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सध्या परिस्थिती सामान्य आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर परिसरात तणाव वाढला. यानंतर कट्टरवाद्यांच्या जमावाने हल्ला केला.

    हिंदूंवर वर्षानुवर्षे हल्ले होत आहेत

    काही महिन्यांपूर्वी बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉनच्या राधाकांता मंदिरात 200 कट्टरवाद्यांच्या जमावाने भाविकांवर हल्ला केला आणि मंदिराची तोडफोड केली. बांगलादेश मानवाधिकार संघटना ऐन ओ सालिश सेंटर (ASK) च्या अहवालानुसार बांगलादेशात 2013 ते 2021 पर्यंत हिंदूंना लक्ष्य करून 3600 हल्ले झाले.

    या अभ्यासानुसार, या आठ वर्षांमध्ये हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये 550 हून अधिक घरे आणि 440 दुकाने आणि व्यवसायांना लक्ष्य करून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या काळात हिंदू मंदिरे, मूर्ती आणि पूजास्थळांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या 1,670 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

    Attacks on Hindus in Bangladesh: Hindu houses and temples set ablaze by fanatics angered by posts allegedly insulting the Prophet

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या