वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्स (पीएसी) वर झालेल्या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी किमान 25 सुरक्षा जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने केलेल्या या हल्ल्यात 6 आयएसआय, 4 मिलिटरी इंटेलिजन्स आणि 15 नेव्हल कमांडो मारले गेले. या हल्ल्यात तीन चिनी अधिकारी जखमी झाले.Attack during meeting of Sino-Pak officials; 25 Pakistani soldiers killed, 3 Chinese officers injured in Gwadar attack
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बैठकीदरम्यान झालेल्या हल्ल्यामुळे चीन तसेच सुरक्षा यंत्रणांमध्ये सुरक्षेची चिंता वाढली आहे. हल्लेखोरांना सीपीईसी बैठक, पाकिस्तानी व चिनी अधिकारी एकाच खोलीत उपस्थित असल्याची माहिती कशी मिळाली, असे प्रश्न विचारले जात आहेत. हल्ल्यानंतर चीन बलुचिस्तानमध्ये स गुप्तचर नेटवर्क उभारण्याचा विचार करू शकतो. चीनने बलुचिस्तानमध्ये व नंतर केपीकेमध्ये गुप्तचर नेटवर्क स्थापित करण्यासाठी परवानगी मागितली तर ग्वादर हल्ल्यानंतर पाकिस्तान नकार देऊ शकणार नाही.
2013 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानचा हा महत्त्वाचा सागरी भाग चीनला दिला होता. हा चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच CPEC चा सर्वात महत्वाचा भाग आहे.
ग्वादर बंदर सुरुवातीला चीनने बांधले होते, पण नंतर त्याच्या विकासाचे कंत्राट सिंगापूरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. कामाच्या संथ गतीने पाकिस्तानचे समाधान झाले नाही. शुक्रवारी पाक मंत्रिमंडळाने पुन्हा चीनकडे जबाबदारी सोपवण्यास परवानगी दिली.
चीनने ग्वादर बंदरात आपला नौदल तळ बांधावा, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. चीन हे करेल की नाही हे सांगणे कठीण आहे, पण आता चिनी युद्धनौका या बंदराला भेट देऊ शकणार आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या बातमीनुसार, चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे 3,000 किलोमीटर लांबीचा आर्थिक कॉरिडॉर (CPEC) बांधत आहेत. या कॉरिडॉरमुळे चीनला तेलाची वाहतूक करण्यासाठी स्वस्त आणि नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे. याशिवाय मध्यपूर्व आणि आफ्रिकन देशांमध्ये चिनी उत्पादने पोहोचवणे सोपे होणार आहे.
Attack during meeting of Sino-Pak officials; 25 Pakistani soldiers killed, 3 Chinese officers injured in Gwadar attack
महत्वाच्या बातम्या
- पृथ्वीराज चव्हाणांच्या पक्षनिष्ठेला अखेर हायकमांडकडून “न्याय”; काँग्रेसची महाराष्ट्रातील प्रचारसूत्रे बाबांच्या हाती!!
- मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेचे ASI सर्वेक्षण उद्यापासून सुरू होणार
- निवडणुकीच्या तोंडावर अटकेचा केजरीवालांचा कांगावा, पण त्यांनीच आधी टाळली होती ED ची तब्बल 9 समन्स!!
- दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधी, ईडीचे पथक पोहचले केजरीवालांच्या घरी!