विशेष प्रतिनिधी
जपान : जपानमधील ओसाका शहरामध्ये एका मानसिक आरोग्य उपचार केंद्राच्या इमारतीत आग लागल्याने 27 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. ओसाका हे जपानचे प्रमुख आर्थिक केंद्र आहे. टोकियो नंतर ओसाका हे तेथील सर्वात मोठे मेट्रो शहर आहे.
At least 27 people have been killed in a fire that broke out in the Japanese city of Osaka
2019 मध्ये देखील क्योटो अॅनिमेशन स्टुडिओमध्ये आग लागली होती. या आगीमध्ये 36 जणांचा मृत्यू झाला होता. ओसाका येथील मानसिक आरोग्य उपचार केंद्रात झालेल्या या आगीमध्ये एकूण 28 जण जखमी झालेले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार यामधील 27 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. त्यामुळे त्यांची जगण्याची शक्यता कमी आहे.
AHAMADNAGAR FIRE :अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक
या आगीमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. एकूण 70 अग्निशामक दलांच्या गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आणि अर्ध्या तासानंतर ही आग विझवण्यात त्यांना यश मिळाले होते.
At least 27 people have been killed in a fire that broke out in the Japanese city of Osaka
महत्त्वाच्या बातम्या
- OMICRON : युरोपात कोरोनाचा कहर ; इंग्लंडमध्ये एका दिवसांत 88 हजार
- तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम, माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले
- अभिनेत्री अलिया भट्टवर होणार कारवाई, हाय रिस्क संपर्कात येऊनही होम क्वारंटाईनचा भंग
- विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड ठाकरे सरकारचे लक्ष्य, आता कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरविणार, आशिष शेलार यांचा आरोप
- काका- पुतण्याची युती, मात्र स्वत;च्या पक्षांची ओळख कायम ठेऊन सोबत लढणार