विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानात रक्ताचे पाट वाहण्यापेक्षा मी निघून जाणेच योग्य होते. आता नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी तालिबानवर आहे, असे अफगणिस्तानचे अश्रफ घनी यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात अश्रफ घनी यांनी म्हटले, की एका पर्यायाची निवड करणे माझ्यासाठी कठीण काम होते.Ashraf Ghani wrote post on social media
एक तर तालिबानचा सामना करणे किंवा देश सोडून देणे. जर तालिबानशी मुकाबला केला असता तर अनेक नागरिक हुतात्मा झाले असते आणि काबूल डोळ्यादेखत बेचिराख झाले असते. ६० लाख लोकसंख्येच्या शहरात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली असती. मला सत्तेवरून हटविण्याचे तालिबानने ठरवले आहे.
त्यामुळे ते कोणत्याही स्थितीत काबूलवर हल्ला करणार होते. म्हणून रक्तपात थांबवण्यासाठी मी देशातून निघून गेलेले बरे. तालिबानने बंदुकीच्या जोरावर युद्ध जिंकले आहे.परंतु लोकांची संपत्ती, आत्मसन्मानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आता तालिबानची आहे.
Ashraf Ghani wrote post on social media
महत्त्वाच्या बातम्या
- MNS WITH BJP : ‘पाटील दिल्ली गाजवतील’; मनसेकडून भाजपसाठी बॅनर भाजप – मनसे एकत्र येणार का?
- विज्ञानाची गुपिते : शरीराला ड जीवनसत्व नेमके लागते किती
- अफगाणिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, ‘यूएन’च्या सरचिटणीसांची चिंता; वाटाघाटी करण्याचे तालिबानला आवाहन
- Afghanistan Rescue Operation : अफगानिस्तान मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘देवदूत’ Indian Air Force
- मेंदूचा शोध व बोध : चुकीच्या सवयी, आहार वेळीच बदला