• Download App
    जगभरात कोरोना ३५ कोटी २३ लाख कोरोनाबाधित, २७ कोटी लोक झाले बरे; तरी ओमायक्रॉनपासून सावध राहण्याचा इशारा|Around the world 35 corona affected, 27 crore people were cured; However WHO says beware of omecron

    जगभरात कोरोना ३५ कोटी २३ लाख कोरोनाबाधित, २७ कोटी लोक झाले बरे; तरी ओमायक्रॉनपासून सावध राहण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचे ३५ कोटी २३ लाख रुग्ण असून त्यातील २७ कोटी ९९ लाख रुग्ण बरे झाले. या संसगार्मुळे आतापर्यंत ५६ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत ७ कोटी १९ लाख जण कोरोनाग्रस्त आहेत. २७ कोटी लोक बरे झाले असले तरी ओमायक्रॉनपासूनही सर्वांनीच सावध राहाण्याची आवश्यकता आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.Around the world 35 corona affected, 27 crore people were cured; However WHO says beware of omecron

    जगात सध्या ६ कोटी ६७ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ९५ हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांपैकी ४ कोटी ४३ लाख लोक बरे झाले ८ लाख ८९ हजार लोकांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे. त्यानंतर भारत, ब्राझील, फ्रान्स, ब्रिटन, रशिया, तुर्कस्थान, इटली, स्पेन, जर्मनी यांचा क्रमांक लागतो.



    रशियामध्ये १ कोटी ११ लाख रुग्ण असून त्यातील १ कोटी २३ हजार जण कोरोनामुक्त झाले. त्या देशात कोरोनामुळे ३ लाख २६ हजार जणांचा मृत्यू झाला. जर्मनीमध्ये ८७ लाख १७ हजार कोरोना रुग्ण असून त्यातील ७२ लाख ७३ हजार जण बरे झाले. तिथे १ लाख १७ हजार जण कोरोना संसगार्ने मरण पावले.

    कोरोनाच्या अल्फा, बीटा, डेल्टा आदी विषाणूंना मागे टाकत त्यांची जागा जगभरात ओमायक्रॉनने घेतली आहे. ओमायक्रॉनचा संसगार्चा वेग मोठा आहे. तो डेल्टापेक्षा कमी घातक आहे, असे सांगितले जात असले तरी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले,

    ओमायक्रॉनची बाधा झालेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. पण काही जणांची प्रकृती या संसगार्ने चिंताजनक झाली तर काहींचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे सर्वांनीच दक्षता बाळगण्याची गरज आहे, असे केरखोव्ह म्हणाल्या. वयोवृद्ध व्यक्ती तसेच ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही अशांना कोरोना संसगार्चा अधिक प्रमाणात धोका आहे. ओमायक्रॉनचा संसगार्चा वेग मोठा असला तरी त्याची बाधा जगातील प्रत्येक माणसाला होईल असे समजण्याचे कारण नाही.

    एकदा कोरोना झाला असला तरी ओमायक्रॉनमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहेच. या नव्या विषाणूमुळे लसींची परिणामकारकता कमी होण्याची शक्यताही आहे.ओमायक्रॉन विषाणूचा बीए.२ हा उपप्रकार सापडला असून त्याला स्टेल्थ ओमायक्रॉन असेही म्हटले जाते.

    त्याचा आतापर्यंत ४० देशांत प्रसार झाला आहे. स्टेल्थ ओमायक्रॉन आरटी-पीसीआर चाचणीलाही गुंगारा देऊ शकतो असेही आढळून आले आहे. या विषाणूमुळे युरोपात कोरोनाची आणखी मोठी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनचे बीए १, बीए. २, बीए.३ असे तीन उपप्रकार आढळले आहेत. त्यातील बीए.३ हा उपप्रकार ओमायक्रॉनच्या संसर्गामध्ये अधिक सक्रिय आहे.तर बीए.२ या विषाणूच्या संसगार्चा वेग अधिक आहे. या विषाणूमुळे भारत, फ्रान्समध्येही रुग्णसंख्या वाढू शकते असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता.

    Around the world 35 corona affected, 27 crore people were cured; However WHO says beware of omecron

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने जपानमधून टायफून क्षेपणास्त्र प्रणाली काढावी; यामुळे प्रदेशाच्या सुरक्षेला धोका

    Trump : ब्रिटनच्या शाही राजवाड्यात ट्रम्प यांचे भव्य स्वागत; किंग चार्ल्ससोबत सोन्याच्या बग्गीतून प्रवास

    Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही