• Download App
    Pakistan Army chief हिंदू द्वेषी विषारी भाषण केलेला असीम मुनीर भारताला सांगितले पाकिस्तानशी सभ्यतेने वागायला!!

    हिंदू द्वेषी विषारी भाषण केलेला असीम मुनीर भारताला सांगितले पाकिस्तानशी सभ्यतेने वागायला!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानात हिंदू द्वेषाचे विषारी भाषण केलेल्या असीम मुनीर याने अमेरिकेत जाऊन भारताला पाकिस्तानशी सभ्यतेने वागायला सांगितले. पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर गेला. तिथे त्याचे पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखासारखे स्वागत केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला diplomatic lunch दिले. त्याबरोबर त्याच्या अंगात “बळ” संचारले. तिथून त्याने भारतालाच पाकिस्तानशी “सभ्यतेने” वागायचा उपदेश केला.

    याच असीम मुनीर याने इस्लामाबाद मध्ये पाकिस्तानी ओव्हरसीज कॉन्फरन्स मध्ये भाषण करताना भारताविरुद्ध आणि हिंदू समाजाविरुद्ध विषारी गरळ ओकले होते. पाकिस्तानी समाज हिंदू समाजापेक्षा आणि भारतीय समाजापेक्षा वेगळा आहे. त्यांची आणि आपली सभ्यता भिन्न आहे.



    संपूर्ण जगाच्या मनावर आपण आपली ही भिन्नता ठसवली पाहिजे, असे असीम मुनीर म्हणाला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये धर्म विचारून 28 हिंदूंचे शिरकाण केले होते. याचा मास्टर माईंड असीम मुनीर हाच होता.

    याच असीम मुनीर याने पाकिस्तानात अमेरिकन पाकिस्तानी कम्युनिटीला संबोधित करताना भारताला पाकिस्तानशी सभ्यतेने वागायचा उपदेश केला. भारताने दक्षिण आशियात स्वतःचे वर्चस्व लादायचा प्रयत्न करू नये. त्यामध्ये तो देश यशस्वी होणार नाही. पाकिस्तान भारताचे वर्चस्व सहन करणार नाही, अशी दमबाजी असीम मुनीर याने केली.

    Army chief asks India to engage with Pakistan like a ‘civilised nation’

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही