खंडोबा तालमीच्या पोरांचे सेलिब्रेशन Argentina Beat’s Brazil by 1-0 in kopa America football league, victory of Argentina celebrated in Kolhapur
विशेष प्रतिनिधी
रिओ दि जानेरो : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं ब्राझीलला धूळ चारत १-० अशा फरकानं विजेतेपदावर नाव कोरलं. कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. फुटबॉलची पंढरी असलेल्या ब्राझीलची राजधानी री रिओ दि जानेरो मधील ऐतिहासिक मराकाना स्टेडियमध्ये ही लढत झाली. त्या विजयाचा जल्लोष कोल्हापुरात साजरा झाला. खंडोबा तालमीच्या पोरांनी नृत्य करून सेलिब्रेशन केले.
तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. यापूर्वी १९९३ मध्ये अर्जेंटिनानं हा किताब आपल्या नावे केला होता. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. या विजयासह अर्जेंटिनानं १५ वेळा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.
कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळे दोन्ही संघाकडून विजेतेपद पटकावण्यासाठी कडवी झुंज दिली.दोन्ही संघांकडून कडवा प्रतिकार बघायला मिळाला.
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील संघ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत दाखल झाल्यानं संपूर्ण फुटबॉल जगताचं लक्ष या सामन्याकडं होतं. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. सामन्यातील पहिल्या २० मिनिटांत दोन्ही संघात झुंज बघायला मिळाली.
दोन्हीकडून तोडीस तोड प्रतिकार केला. गोलपोस्टपर्यंत पोचताच आलं नाही. पण, २२ व्या मिनिटाला एंजल डी. मारिया संघाच्या मदतीला धावला. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यात घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.
- कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिना जिंकला
- अर्जेंटिनाच्या विजयाचा कोल्हापुरात जल्लोष
- ब्राझीलला धूळ चारत १-० अशा फरकानं विजेतेपद
- तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब
- फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा
- पहिल्या २० मिनिटांत दोन्ही संघात कडवी झुंज
- अर्जेंटिनाच्या एंजल डी. मारियाने पहिला गोल केला
- २२ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी
- अखेरपर्यंत ब्राझीलला आघाडी मोडता आली नाही
Argentina Beat’s Brazil by 1-0 in kopa America football league, victory of Argentina celebrated in Kolhapur
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडचा व्लॉगर कार्ल रॉक भारतात ब्लॅकलिस्ट, Visa नियमांच्या उल्लंघनाचा आरोप
- केजरीवाल सरकारने DTC बसेसच्या खरेदीत केला 3500 कोटींचा घोटाळा, भाजप आरोपांवर उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले- आश्चर्य वाटतंय!
- 36 लाख दूध उत्पादकांच्या ‘अमूल’ने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवर मानले आभार, आणखी एका सहकार क्रांतीचे केले स्वागत
- चीनचा नवा डाव : जेनेटिक इंजिनिअरिंगने सैनिकांना शक्तिशाली बनवत आहे ड्रॅगन, अमेरिकाही चिंतित