विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने कोरोनापासून सुरक्षेसाठी १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मोठा धोका असलेल्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी फायझरच्या कोविड गोळीला मंजुरी दिली आहे. हे औषध तोंडावाटे घ्यायचे आहे.Approval of Pfizer’s covid tablet for protection from corona
हे औषध करोनाविरुद्धच्या लढाईत प्रभावी ठरेल, असे एफडीएचे शास्त्रज्ञ पॅट्रिझिया कॅवाझोनी यांनी सांगितले.या औषधाची २२०० नागरिकांवर चाचणी करण्यात आली. जोखीम असलेल्या नागरिकांमध्ये या औषधाने हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका ८८ टक्यांनी कमी केल्याचे दिसून आले.
फायझरच्या उपचारांना पूर्वी युरोपियन युनियनमध्ये अधिकृत केले गेले आहे.अमेरिकेने औषधाच्या १० मिलियन कोर्सेससाठी आधीच पैसे दिले आहेत. कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचे अमेरिकेतही अनेक रुग्ण समोर आले आहेत. त्याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.
त्याच वेळी, मर्कद्वारे विकसित केलेली आणखी एक कोविड गोळी नागरिकांच्या उपचारासाठी येत आहे. ही गोळीही पाच दिवसांसाठी घेतली जाते आणि या गोळीने करोनाचा उच्च धोका असलेल्या नागरिकांमध्ये धोका ३० टक्क्यांनी कमी केला,असा दावा करण्यात आला आहे.
Approval of Pfizer’s covid tablet for protection from corona
महत्त्वाच्या बातम्या
- इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर काव्यात्मक हल्लाबोल
- उत्तर प्रदेशांत सभांवर बंदी घाला, विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे पंतप्रधानांना आवाहन
- ऑलवेज देअर फॉर यू, उदयनराजे भोसले व्यासपीठावरच रडू लागले
- पाश्चात्य संगीतापेक्षा विमानांमध्ये भारतीय संगीताला प्राधान्य द्यावे, नामांकित गायक व संगीतकारांची ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी