• Download App
    अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भारतीय पाऊल पडते पुढे, नीरा टंडन यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती|An Indian step forward in the US White House, the appointment of Neera Tandon as Senior Advisor

    अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भारतीय पाऊल पडते पुढे, नीरा टंडन यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती

    अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडेन यांची निवड झाल्यावर त्यांच्या नव्या टीममध्ये मुळ भारतीय वंशाच्या अनेकांना महत्वाची पदे देण्यात आली आहेत. व्हाईट हाऊसमध्ये भारतीय पाऊल पुढे पडत आहे.भारतीय अमेरिकी धोरणतज्ज्ञ नीरा टंडन यांची व्हाइट हाऊसमध्ये अध्यक्ष जो बायडेन यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.An Indian step forward in the US White House, the appointment of Neera Tandon as Senior Advisor


    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडेन यांची निवड झाल्यावर त्यांच्या नव्या टीममध्ये मुळ भारतीय वंशाच्या अनेकांना महत्वाची पदे देण्यात आली आहेत.

    व्हाईट हाऊसमध्ये भारतीय पाऊल पुढे पडत आहे.भारतीय अमेरिकी धोरणतज्ज्ञ नीरा टंडन यांची व्हाइट हाऊसमध्ये अध्यक्ष जो बायडेन यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.



    टंडन यांनी व्हाइट हाऊसमधील अर्थसंकल्प व्यवस्थापन पदासाठी केलेला अर्ज रिपब्लिकनांच्या तीव्र विरोधामुळे दोन महिन्यांपूर्वी माघारी घेतला होता. रिपब्लिकनांनी परवडणारी आरोग्य सेवा कायदा रद्द केला होता,

    त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जे खटले चालतील किंवा जे निकाल येतील त्यावर अध्यक्षांना सल्ला देण्याचे काम नीरा टंडन करणार आहेत. अमेरिकन डिजिटल सेवेचा फेरआढावा त्या घेणार आहेत.

    पन्नास वर्षीय टंडन या सध्या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या संस्थेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सोमवारी त्या व्हाइट हाऊसमध्ये काम सुरू करतील. बायडेन प्रशासनाने म्हटले आहे,की नीरा यांची बुद्धिमत्ता , चिकाटी, राजकारणाची आवड हे गुण महत्त्वाचे आहेत.

    यापूर्वी त्यांनी आरोग्य सल्लागार म्हणून व्हाइट हाऊसमध्ये काम केले आहे. ओबामा—बायडेन प्रशासनातही टंडन यांनी देशांतर्गत धोरण संचालक म्हणून काम केले होते. हिलरी क्लिंटन यांच्या अध्यक्षीय निवडणूक प्रचारातही त्यांनी धोरण संचालक म्हणून काम केले होते.

    अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस निवडून आल्या आहेत. याशिवाय ज्यो बायडेन यांच्या टीममध्ये अनेक महत्वाच्या पदांवर भारतीय वंशाचे नागरिक काम करत आहेत.

    यामध्ये राहुल गुप्ता – राष्ट्रीय औषध नियंत्रण धोरण, किरण अहुजा – कर्मचारी व्यवस्थापन, पुनीत तलवार – परराष्ट्र विभाग, पाव सिंह – राष्ट्रीय सुरक्षा परिषद, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अरुण वेंकटरमण – वाणिज्य आणि यूएसटीआर, प्रवीण राघवन, आत्मन त्रिवेदी – वाणिज्य विभाग, शीतल शाह – शिक्षण विभाग,

    आर रमेश, रामा झाकिर – ऊर्जा विभाग, शुभश्री रामनाथन – अंतर्गत सुरक्षा विभाग, राज डे – न्याय विभाग, सीमा नंदा, राज नायक – कामगार विभाग, रीना अग्रवाल, सत्यम खन्ना – फेडरल रिझर्व आणि बँकिंग आणि सिक्युरिटीज नियामक व्यवहार, भव्या लाल – नासा, दिलप्रीत सिद्धू – राष्ट्रीय सुरक्षा परिषद, दिव्य कुमारियाह -व्यवस्थापन आणि बजेट कार्यालय, कुमार चंद्रण – कृषी विभाग अनिश चोप्रा – टपाल सेवा यांचा समावेश आहे.

    An Indian step forward in the US White House, the appointment of Neera Tandon as Senior Advisor

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या