विशेष प्रतिनिधी
हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असून आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे, अशी चिंता ऑम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.Amnesty International targets China
हाँगकाँगमध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ २०१९ मध्ये भव्य निदर्शने झाली, ज्यास काही वेळा हिंसक वळण मिळाले. त्यानंतर स्थैर्य निर्माण करण्याच्या उद्देशाने चीनने कडक कायदा कला आहे. त्याचा वापर लोकशाही मुल्यांची मागमी करणाऱ्यांविरद्ध केला जात आहे.
लोकशाहीवादी चळवळीचा बीमोड करण्याच्या उद्देशाने चीनने हा कायदा लागू केला आहे. एका वर्षात या कायद्यामुळे पोलिसांचा अंमल असलेल्या प्रांतात हाँगकाँगचे रूपांतर झाले आहे. तेथे राहणाऱ्या लोकांच्या मानवी हक्कांबाबत आणीबाणीची स्थिती निर्माण होणे चिंताजनक आहे.
ब्रिटनने १९९७ मध्ये हस्तांतर केल्यापासूनचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता कायम ठेवू अशी ग्वाही चीनने दिली होती. प्रत्यक्षात पोलिसांनी राजकीय भाषणे देणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना जेरबंद केले आहे.
Amnesty International targets China
महत्त्वाच्या बातम्या
- सावधान, तुमचे मोबाईलवरील बोलणे कोणीतरी ऐकतेय, गुगल कंपनीनेच केले मान्य
- सोनियानिष्ठ सुशीलकुमार शिंदेचीही जी- २३ नेत्यांची भाषा , म्हणाले पक्षात संवाद, चर्चेची परंपरा संपुष्ठात, आत्मचिंतनाची गरज
- लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात विरोधी साक्ष दिली म्हणून कॉँग्रेसच्या नेत्याने आपल्याच पक्षातील नेत्याला भर रस्त्यात बेदम चोपले. छत्तीसगडच्या बालोद येथे हा प्रकार घडला.
- सामान्यांवर डाफरणाऱ्या अजितदादांच्या उपस्थितीत कोरोना नियमावलीची ऐशीतैशी, लग्नाला शेकडो लोक असूनही त्यांनी केले समर्थन
- मराठा समाजाला सरकारी नोकरीत पुरेसे प्रतिनिधीत्व, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मराठा आरक्षणाबाबत पुर्नविचार याचिका