Chinese Economy : चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागच्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 2021च्या पहिल्या तिमाहीत 18.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या साथीनंतर चीनमध्ये कारखाने आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार वेगाने सामान्य होत असल्याने अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे. Amid Corona epidemic Chinese economy grows 18.3% in first quarter
वृत्तसंस्था
बीजिंग : चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागच्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 2021च्या पहिल्या तिमाहीत 18.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या साथीनंतर चीनमध्ये कारखाने आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार वेगाने सामान्य होत असल्याने अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे.
शुक्रवारी चीनच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी जाहीर झाली. जगातील दुसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत गतवर्षी याच कालावधीत एका दशकातील सर्वात मोठी घसरण झाली होती.
2020च्या शेवटच्या तिमाहीच्या तुलनेत व्यवहारांमध्ये चांगलीच वाढ असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
चीनच्या कम्युनिस्ट सरकारने गतवर्षी मार्चमध्ये कोरोना विषाणूवर मात केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर उत्पादन, वाहन विक्री आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार हे महामारी येण्याच्या आधीच्या पातळीवर गेले आहेत.
तथापि, अलीकडच्या चांगल्या कामगिरीनंतरही चिनी अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनावर परिणाम होऊ शकतो. कारण साथीच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक मागणीवर अनिश्चित परिणाम झाला आहे. काही देशांनी साथीला आळा घालण्यासाठी नव्याने निर्बंध लादायला सुरुवात केली आहे. गतवर्षी पहिल्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था 6.8 टक्क्यांनी घसरली होती.
Amid Corona epidemic Chinese economy grows 18.3% in first quarter
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राच्या उपाययोजनांची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, म्हणाले- केंद्राची रणनीती म्हणजे लॉकडाऊन लगाओ, घंटी बजाओ!
- Ranjit Sinha Death : सीबीआयचे माजी प्रमुख रणजित सिन्हा यांचे दिल्लीत निधन
- देशात कोरोनाचा सर्वात मोठा उद्रेक, 24 तासांत 2.17 लाख नवीन रुग्ण, 1185 जणांचा मृत्यू
- कोरोना संसर्गानंतर रुग्णाच्या रक्तामध्ये गाठी होण्याचा मोठा धोका ; तज्ज्ञाचा इशारा
- पुण्याचा टेस्ट पॉॅझिटिव्हीटी रेट झाला कमी ; 30 टक्क्यांवरून प्रमाण घसरले 21 टक्क्यांवर