वृत्तसंस्था
तैपेई : चीनच्या धमकीकडे दुर्लक्ष करत अमेरिकन संसदेचे खालचे सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (८२) मंगळवारी सायंकाळी तैवानची राजधानी तैपेईला पोहोचल्या. अमेरिकन लष्कराच्या 24 लढाऊ विमानांनी नॅन्सी यांच्या विमानाला संरक्षण दिले.America’s direct challenge to China Pelosi arrives with 24 fighter jets, China threatens to attack
या दौऱ्यावरून चीनने दिलेल्या धमकीमुळे अमेरिकेने 4 युद्धनौका आणि एक विमानवाहू जहाज तैवानजवळ तैनात केले होते. चीननेही तैवानच्या हवाई क्षेत्रात फायटर जेट तैनात केले होते. पेलोसी यांना रोखण्यासाठी चीन विमान पाठवू शकतो, अशी शक्यता होती.
सु-35 फायटर जेटने सीमा ओलांडल्याचे वृत्तही चिनी माध्यमांनी दिले होते. तथापि, यानंतर माहिती मिळाली नाही. दौऱ्यामध्ये कोणत्याही हस्तक्षेपावर अमेरिकन विमानांना हल्ल्याची परवानगी होती.
चीन का भडकला?
चीन कोणत्याही बिगरचिनी नागरिकांना तैवानमध्ये प्रवेश करू देत नाही. म्हणून पेलोसींना विरोध करत आहे. ही कृती म्हणजे वन चायना पॉलिसी व चीन-अमेरिका कराराचे गंभीर उल्लंघन आहे. त्यामुळे चीन-अमेरिका संबंध कमकुवत होतील. हे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. म्हणजे हा दौरा चीनच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेपासारखा आहे. तैवानमधील शांती-स्थैर्याला धोका निर्माण होईल.
अमेरिकेने पेलोसींना का पाठवले?
पेलोसी तीन दशकांच्या कार्यकाळात चीनच्या कट्टर विरोधक राहिल्या. हाँगकाँगच्या 2019 मधील लोकशाहीविरोधी आंदोलनाच्या त्या कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे त्या बीजिंगच्या निशाण्यावर आल्या होत्या. तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांचे प्रशासन लोकशाही मूल्यांचे समर्थक राहिले आहे. पेलोसी त्यांना पसंत करतात.
तणावात वाढ
चीन तैवानला आपले क्षेत्र सांगत आला आहे. गरज भासल्यास तो बळाचा वापर करून वर्चस्व मिळवेल. परंतु त्यास अमेरिकेचा विरोध आहे.
America’s direct challenge to China Pelosi arrives with 24 fighter jets, China threatens to attack
महत्वाच्या बातम्या
- उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला दगडफेक; ते शिवसैनिक नव्हते, विनायक राऊतांचा खुलासा; 8 दिवसांत प्रत्युत्तर ; तानाजी सावंत
- नोकरीची संधी : एसटी महामंडळात लवकरच 1050 कंत्राटी वाहक भरती!!
- Commonwealth Games 2022 : लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी; टेबल टेनिस मध्ये पुरुषांना सुवर्णपदक!!
- Commonwealth Games 2022 : लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी!!