• Download App
    या पक्षाचा वर्ल्ड रेकॉर्ड! २३९ तास-एकही क्षण न थांबता - १३ हजार किलोमीटरचा प्रवास ; IFS ऑफिसरचे ट्विटAlaska to Australia: World record for this party

    Alaska to Australia : या पक्षाचा वर्ल्ड रेकॉर्ड! २३९ तास-एकही क्षण न थांबता – १३ हजार किलोमीटरचा प्रवास ; IFS ऑफिसरचे ट्विट

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एका पक्षाचा वर्ल्ड रेकॉर्ड समोर आला आहे. या पक्षाने २३९ तासात १३ हजार किलोमीटर अंतर पार केलं आहे. विशेष बाब म्हणजे या पक्षानं इतकं मोठं अंतर न थांबता म्हणजेच ब्रेक न घेता पार केलं आहे.आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी ही पोस्ट ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.Alaska to Australia: World record for this party

    त्यांनी ट्विट करत सांगितलं, की एका Bar-tailed Godwit ने न थांबता आणि आराम न करता १३ हजार किलोमीटर प्रवास केला.

    या पक्षाने अलास्का ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास केला. आपल्या या जिद्दीसोबतच पक्षाने स्वतःच्या नावे रेकॉर्ड नोंदवला आहे, कारण याआधी इतक्या दूरपर्यंत न थांबता कोणत्याही पक्षाने प्रवास केलेला नाही. या पक्षाचे फोटो Geoff White/Adrien Riegen ने कॅप्चर केले आहेत.

    या पक्षाची ही जिद्द आणि मेहनत पाहून सगळेच हैराण झाले आहेत. एका यूजरनं या पक्षाचं कौतुक करत लिहिलं, माहिती नव्हतं की पक्षी आराम न करता इतकं अंतर कापू शकतात आणि सलग उडू शकतात. याशिवाय इतरही अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत पक्षाचं कौतुक केलं आहे.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nepal Education : नेपाळ सरकारने विद्यार्थी राजकारणावर बंदी घातली; 5वी पर्यंतच्या परीक्षाही रद्द; शाळा आणि महाविद्यालयांना त्यांची परदेशी नावे बदलावी लागतील

    Drug Kingpin : इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा पुतण्या न्यूझीलंडचा मोठा ड्रग्ज तस्कर; 22 वर्षांची शिक्षा झाली, ओळख लपवण्याची याचिका मागे घेतली

    Trump : अमेरिकेत ट्रम्पविरोधात 80 लाख लोकांचा मोर्चा; 3,300 ठिकाणी निदर्शने, इराण युद्ध आणि महागाईवरून पदावरून हटवण्याची मागणी