विशेष प्रतिनिधी
दुबई – अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यामुळे अल कायदा ही दहशतवादी संघटना पुन्हा आपले सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करू शकते, असा अंदाज अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी व्यक्त केला आहे. Al quida once again became strong says USA
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानी नेत्यांबरोबर करार करत अल कायदा किंवा इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेला अमेरिकेविरोधात पाठबळ मिळणार नाही, याची तालिबानकडून हमी घेतली होती. मात्र, तालिबान अद्यापही अल कायदाच्या म्होरक्यांच्या जवळून संपर्कात असल्याचा अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा आहे.
ऑस्टिन म्हणाले,‘‘तालिबानच्या हातात सत्ता गेल्याने त्यांचेच सहकारी असलेल्या अल कायदाला बळ प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. १९९६ ते २००१ या कालावधीत तालिबान सत्तेत असताना त्यांनी अल कायदासाठी रान मोकळे केले होते.
अमेरिकेवरील हल्ल्यानंतर अल कायदाच्या म्होरक्यांना अटक करण्यास तालिबानने नकार दिल्याने अमेरिकेने आक्रमण करत तालिबानी सत्ता उलथवून टाकली. मागील २० वर्षांत अमेरिकेने अल कायदाची पाळेमुळे खणून काढली असली तरी तालिबानची सत्ता पुन्हा आल्याने त्यांच्यात धुगधुगी निर्माण झाली आहे.’’
Al quida once again became strong says USA
महत्त्वाच्या बातम्या
- आकाशावर लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाला मिळणार सहा विमाने, अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर
- भाषिक कट्टरता धोकादायक, हिंदी अधिकृत भाषा नसणाऱ्या राज्यांशी केंद्राने साधावा इंग्रजीमध्ये संवाद, मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
- लस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारचा बडगा, 15 सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश
- वर्क फ्रॉम होम नको रे बाप्पा..! तातडीने वर्क फ्रॉम ऑफिस सुरु न केल्यास लग्न टिकणारच नसल्याने कर्मचार्याच्या पत्नीचे उद्योगपतीला साकडे