वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेने तालिबानी अफगाणिस्तानात घुसून सर्वात मोठी कारवाई करत सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल आयमन जवाहिरीला ठार केले आहे. अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सनेही बातमी दिली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेने ड्रोन स्ट्राईक करून मोठी कारवाई केल्याची घोषणा व्हाईट्स हाऊसने केली आहे. ओसामा बिन लादेन याला ठार केल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.Al Qaeda’s Post-Laden Leader Al Zawahiri Killed in US Drone Strike!!; A major operation by the Taliban in Afghanistan
अमेरिकेच्या दहशतवाद विरोधातील या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना मोठा दणका बसला आहे. अल जवाहिरीवर अमेरिकेने 25 मिलियन डॉलरचे बक्षिस ठेवला होते. व्हाईट हाऊसने अफगाणिस्तानात एक लक्ष्य पूर्ण करण्यात आल्याचा दावा केला असला तरी अमेरिकन सरकारने जवाहिरीला मारल्याचा कोणताही दावा केलेला नाही.
राष्ट्रपती जो बायडन हे अफगाणिस्तानात अल कायदाच्या विरोधातील दहशतवाद विरोधी अभियानाबाबत संध्याकाळी 7.30 वाजता माहिती देतील, असे व्हाइटस हाऊसने म्हटले आहे.
कोण होता जवाहिरी?
इजिप्तमधील डॉक्टर आणि सर्जन अयमान अल जवाहिरीने 11 सप्टेंबर 2001च्या हल्ल्यात समन्वय साधण्यासाठी मदत केली होती. त्यावेळी चार विमानांचे अपहरण केले होते आणि न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 3000 लोक मारले गेले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये घुसून सीआयएद्वारे ड्रोन हल्ला केला आहे.
अमेरिकेचे अभियान यशस्वी
तालिबानी अफगाणिस्तानात अमेरिकेने एक महत्त्वपूर्ण लक्ष्य म्हणून दहशतवाद विरोधी अभियान हाती घेतले. ऑपरेशन यशस्वी ठरलं. या हल्ल्यात एकाही नागरिकाला काहीही झाले नाही. शेरपूरच्या एका घराला रॉकेटद्वारा लक्ष्य केले. हे घर रिकामे असल्याने कोणतेही मोठे नुकसान झाले नाही, असे अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी ताकोर यांनी सांगितले. तर, तालिबानच्याच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी काबुलवरून कमीत कमी एक ड्रोन उडाल्याची माहिती मिळाली होती.
अल आयमन जवाहिरीच्या कारवाया
अल आयमन जवाहिरीने वरिष्ठ अल कायदा सदस्यांच्या साथीने यमनमध्ये अमेरिकेच्या कोल नौसैनिक जहाजावर 12 ऑक्टोबर 2000 रोजी हल्ल्याचे षडयंत्र रचले होते. या हल्ल्यात 17 अमेरिकन नाविक ठार, तर 30 हून अधिकजण जखमी झाले होते. 7 ऑगस्ट 1998 मध्ये केनिया आणि टांझानियामध्ये अमेरिकन दूतावासावर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अल जवाहिरीला दोषी ठरवले होते. या हल्ल्यात 224 लोक मारले गेले होते आणि 5,000 हून अधिक लोक जखमी झाले होते.
Al Qaeda’s Post-Laden Leader Al Zawahiri Killed in US Drone Strike!!; A major operation by the Taliban in Afghanistan
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : EDने जप्त केलेल्या वस्तूंचे पुढे काय होते? कोट्यवधींचे दागिने, अब्जावधींची संपत्ती कुठे जाते? वाचा सविस्तर…
- मंकीपॉक्समुळे देशात पहिला मृत्यू : UAE मधून केरळला परतला होता 22 वर्षीय तरुण, परदेशातही आढळला होता संसर्ग
- एकाच दिवशी 72.42 लाखांपेक्षा जास्त ITR दाखल करण्याचा नवा विक्रम ; 31 जुलैपर्यंत 5.83 कोटी विवरणपत्रे दाखल
- GST Collection : जुलैमध्ये जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी रुपये, तब्बल २८% वाढ; करचोरीही घटली