वृत्तसंस्था
तेल अवीव : Al-Aqsa Mosque जगभरात ईदचा उत्सव सुरू झाला आहे. मध्यपूर्वेत अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात गेल्या 22 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत, 60 वर्षांत पहिल्यांदाच इस्त्राईलच्या जेरुसलेममधील अल-अक्सा मशीद ईदच्या नमाजासाठी बंद करण्यात आली आहे.Al-Aqsa Mosque
1967 च्या अरब-इस्त्रायल युद्धानंतर पहिल्यांदाच अल-अक्सा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुसलमानांसाठी मक्का आणि मदिनानंतर हे तिसरे सर्वात पवित्र स्थळ आहे.Al-Aqsa Mosque
इराणमध्ये ईदचे बाजार ओस पडलेले दिसले. तर कतार, यूएई आणि कुवेतसारख्या देशांमध्ये खुल्या मैदानांवर नमाज पठणावर बंदी घालण्यात आली आहे.Al-Aqsa Mosque
आखाती देशांमध्ये शुक्रवारी ईद साजरी करण्यात आली
इराण वगळता जवळपास सर्व आखाती देशांमध्ये शुक्रवारी ईद साजरी करण्यात आली. इराणमध्ये सामान्यतः पर्शियन नववर्ष आणि ईद-उल-फितरच्या आधीच्या दिवसांमध्ये हे बाजार खूप गजबजलेले असत. लोक भेटवस्तू, कपडे आणि खाण्यापिण्याचे सामान खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येत असत.
पण यावेळी परिस्थिती बदलली आहे. बाजारात पूर्वीसारखी गर्दी नाही आणि सणांची लगबगही नाही. कमी लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत, ज्यामुळे सणाची चमक फिकी पडताना दिसत आहे.
ईदनिमित्त पाक-अफगाण युद्ध 4 दिवसांसाठी थांबले
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने ईद-उल-फितरच्या निमित्ताने युद्धात तात्पुरत्या विरामची घोषणा केली. युद्ध 5 दिवसांसाठी थांबवण्यात आले आहे. सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि कतारच्या आवाहनानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी सांगितले की, हा शस्त्रसंधी 18/19 मार्चच्या रात्रीपासून 23/24 मार्चच्या रात्रीपर्यंत लागू राहील. तथापि, कोणत्याही सीमापार हल्ल्यास, ड्रोन हल्ल्यास किंवा पाकिस्तानात दहशतवादी घटना घडल्यास, ऑपरेशन त्वरित पुन्हा सुरू केले जाईल.
ईदसाठी विशेष उड्डाणे
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि ओमानसाठी नियमित आणि विशेष उड्डाणे चालवतील.
एअरलाईन्सच्या मते, काही उड्डाणे सध्या तात्पुरती बंद आहेत, परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
दोन्ही एअरलाईन्सने हे देखील सांगितले की जेद्दा (सौदी अरेबिया) आणि मस्कत (ओमान) साठी नियमित उड्डाणे सुरू राहतील. यात भारत आणि जेद्दा दरम्यान सुमारे 16 उड्डाणांचा समावेश आहे.
एअरलाईन्सचे म्हणणे आहे की, परिस्थितीनुसार पुढील योजनेत गरजेनुसार बदल केले जाऊ शकतात.
Al-Aqsa Mosque Closed for Eid First Time Since 1967; Iran Markets Empty VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- रुपाली चाकणकरांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा!;भोंदूबाबा खरात प्रकरणाचा पहिला मोठा बळी!
- NIA : रशियन इनपुटवरून NIA ने पकडले होते अमेरिकन-युक्रेनियन नागरिक; म्यानमार सीमेवर सशस्त्र गटांना प्रशिक्षण दिले
- अशोक खरातच्या भोंदू उद्योगात, राष्ट्रवादीचेच नेते संशयाच्या घेऱ्यात!!
- PM Modi : मोदींची 24 तासांत 4 राष्ट्राध्यक्षांशी चर्चा; मॅक्रॉन यांना सांगितले- पश्चिम आशियातील तणाव कमी करणे आवश्यक