• Download App
    अफगणिस्थानचा गृहमंत्री आहे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, भारतीय दूतावासावरील हल्यातही होता सहभाग Afghanistan's Home Minister is one of the most wanted terrorists, was also involved in the attack on the Indian embassy

    अफगणिस्थानचा गृहमंत्री आहे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, भारतीय दूतावासावरील हल्यातही होता सहभाग

    विशेष प्रतिनिधी

    काबुल : अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचा गृहमंत्री बनलेला सिराजुद्दीन हक्कानी मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. अमेरिकेने त्याचावर 50 लाख डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं होतं. भारतीय दूतावासावरील हल्यातही त्याचा सहभाग आहे. सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तान क्षेत्राशी संबंधित आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेशीही त्याचे घनिष्ठ संबंध आहेत. Afghanistan’s Home Minister is one of the most wanted terrorists, was also involved in the attack on the Indian embassy

    हक्कानीने पाकिस्तानात बसून अफगाणिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले केले होते. यामध्ये अमेरिका आणि नाटो सैन्याला लक्ष्य करण्यात आलं होतं. याशिवाय सिराजुद्दीन हक्कानी 2008 मध्ये हमीद करझाईच्या हत्येच्या कटात सहभागी होता. सिराजुद्दीनची दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क म्हणूनही ओळखली जाते. सिराजुद्दीन हक्कानी 2008 मध्ये काबूलमधील एका हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वॉन्टेड होता. या हल्यात एका अमेरिकन नागरिकासह सहा जण ठार झाले होते.



    सिराजुद्दीन हा जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा आहे. अफगाणिस्तानातील सरकारविरोधातील हल्यांमध्ये काही वेळा तालिबानपेक्षा हक्कानी नेटवर्कचं नाव पुढे आले होते. भारताने अफगाणिस्तानच्या हमीद करझाई सरकारशी जवळीक वाढवायला सुरुवात केली होती, तेव्हाचा हा काळ होता. सरकारविरोधात हक्कानी नेटवर्कची जबाबदारी जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा सिराजुद्दीनने सांभाळली होती. सिराजुद्दीन वडिलांपेक्षा जास्त धोकादायक मानला जात होता. 2008 पासून 2020 पर्यंत अफगाणिस्तानात झालेल्या अनेक मोठ्या हल्यांना हक्कानी नेटवर्क जबाबदार आहे. सध्या या संघटनेमध्ये 10 हजार ते 15 हजार दहशतवादी असल्याचा अंदाज आहे.

    हक्कानी नेटवर्कच्या तीन सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक 27 एप्रिल 2008 रोजी झाला. जेव्हा तालिबानसह हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी तत्कालीन अफगाण अध्यक्ष हमीद करझाई यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला एका हाय प्रोफाईल लष्करी परेड दरम्यान झाला. ज्यात अमेरिकेचे राजदूतही उपस्थित होते. हा हल्ला बंदूकधारी दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्लेखोरांसह केला होता. या हल्ल्यात एका अफगाणिस्तानच्या खासदारासह तीन जण ठार झाले. अफगाणिस्तानातील हक्कानी नेटवर्कच्या आणखी एका मोठ्या हल्ल्याने भारताला धक्का दिला. 7 जुलै 2008 रोजी हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी काबुलमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य केले होते. दूतावासाची इमारत अफगाणिस्तानच्या सर्वात सुरक्षित भागात होती, पण दहशतवाद्यांनी कारमधून स्फोट घडवून आणला. या हल्यात सहा भारतीयांसह 58 लोक ठार झाले, तर 100 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.

    Afghanistan’s Home Minister is one of the most wanted terrorists, was also involved in the attack on the Indian embassy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या