तालिबान पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत किमान १०० लोक मारले गेले तर बहुतेक लोक जखमी झाले आहेत.Afghanistan: Massive blast at a mosque during Friday prayers, killing 100 people
विशेष प्रतिनिधी
काबूल :अफगाणिस्तानात शुक्रवारी ( आज ) मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर कुंदुज प्रांतात शुक्रवारच्या नमाज दरम्यान एका मशिदीत मोठा स्फोट झाला आहे. तालिबान पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत किमान १०० मारले गेले आहेत तर बहुतेक लोक जखमी आहेत.
शिया मुस्लिमांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तालिबान अधिकारी मित्र मोहम्मद ओबैदाह यांनी सांगितले की, 100 लोक मारले गेले आहेत तर बहुतेक लोक हल्ल्याच्या कचाट्यात सापडले आहेत.
माहिती आणि संस्कृती उपमंत्री जबीउल्ला मुजाहिदी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, आज दुपारी कुंदुजमधील खानाबाद बंदर भागात शिया नागरिकांच्या मशिदीला स्फोट करण्यात आला आणि अनेक नागरिक मारले गेले तसेच काही जखमीही झाले आहेत .
त्यांनी सांगितले की, सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहे आणि हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारच्या नमाजसाठी मशिदीत ३०० लोक उपस्थित होते. त्यातील किमान १०० लोक हल्ल्याच्या कचाट्यात आले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
आयएस शिया मुस्लिमांना लक्ष्य करत आहे
आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र, आयएस बऱ्याच काळापासून अफगाणिस्तानातील शिया मुस्लिमांना लक्ष्य करत आहे. अमेरिकन सैन्य माघारीनंतर तालिबानच्या राजवटीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे.
Afghanistan: Massive blast at a mosque during Friday prayers, killing 100 people
महत्त्वाच्या बातम्या
- Air Force Day : ‘ एअर फोर्स डे ‘ दिनानिमित्त बारावीनंतर महिला फ्लाइंग ऑफिसर बनू शकतात , कसे ते जाणून घ्या
- एसीबीने केली पोलीस अधिकारी सुजाता पाटील यांना अटक
- Cruise Ship Drug Party Case : क्रूझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानचा जामीन फेटाळला, जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याची सूचना
- फिलिपीन्सच्या पत्रकार मारिया रेसा, रशियातील दिमित्री मुरातोव यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर