Three Afghan civilians fell from flying Globemaster Plane : अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले, तर विमानाने उड्डाण घेतल्यावर तीन प्रवासी आकाशातून कोसळल्याची माहिती समोर आली आहे. Afghanistan Crisis Three Afghan civilians fell from flying Globemaster Plane and five dead in Kabul Airport
वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले, तर विमानाने उड्डाण घेतल्यावर तीन प्रवासी आकाशातून कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
विमान झेपावल्यावर तीन जण कोसळले
अफगाणिस्तानात तालिबानचा कब्जा झाल्यापासून मोठ्या संख्येने लोक देश सोडून पळून जात आहेत. दरम्यान, काबूल विमानतळावरून निघालेल्या विमानातून तीन प्रवासी खाली कोसळले आहेत. या प्रवाशांना विमानाच्या आत जागा मिळू शकली नाही. त्यानंतर ते लटकलेले होते. त्याच वेळी जेव्हा विमानाने हवेत उड्डाण घेतले, तेव्हा हे तिघे आकाशातून खाली पडू लागले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तिन्ही लोक पडताना दिसत आहेत. तालिबान्यांनी राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. लोक देश सोडण्यासाठी विमानतळाजवळ येत आहेत.
विमानतळावर गोळीबार
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने साक्षीदारांच्या हवाल्याने सांगितले की, काबूल विमानतळावर किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोकांनी अफगाणिस्तानची राजधानी सोडून विमानांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सुरक्षा दलांनी गोळीबार सुरू केला. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की त्यांनी पाच जणांचे मृतदेह वाहनांमध्ये टाकून नेताना पाहिले. आता विमान उड्डाणानंतर प्रवासी खाली कोसळण्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थेनुसार, पीडितांना गोळ्या झाडून मारले गेले की चेंगराचेंगरीत मेले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, विमानतळाचे प्रभारी अमेरिकन सैनिकांनी यापूर्वी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. मात्र, अधिकाऱ्याने मृत्यूबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून मोठ्या संख्येने लोक देश सोडून पळून जात आहेत. जमिनीवरील सीमा बंद केल्यानंतर, लोकांची गर्दी विमानतळावर पोहोचली.
अमेरिका आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यात मग्न
अमेरिकेने रविवारी उशिरा वॉशिंग्टनमध्ये घोषणा केली की, ते विमानतळ सुरक्षित करण्यासाठी पावले उचलत आहे. कारण वॉशिंग्टनने हजारो अमेरिकन नागरिकांना तसेच स्थानिक पातळीवर कार्यरत कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना देशाबाहेर काढले आहे. सर्व ग्राउंड बॉर्डर क्रॉसिंग्स आता बंडखोर गटाच्या नियंत्रणाखाली आहेत. अशा परिस्थितीत विमानतळ हा देशाबाहेर जाण्याचा शेवटचा मार्ग आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये मोठ्या संख्येने लोक विमानतळाच्या दिशेने धावताना दिसत आहेत. ते विमानात चढण्यासाठी एकमेकांना ढकलून पुढे जात आहेत.
Afghanistan Crisis Three Afghan civilians fell from flying Globemaster Plane and five dead in Kabul Airport
महत्त्वाच्या बातम्या
- जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भागवत कराडांविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी कडक शब्दांत सटकावले
- शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
- पेगाससचा हेरगिरीचा मुद्दा संवेदनशील, तो विरोधकांनी सनसनाटी बनविला; सरकार स्वतंत्र चौकशी समिती बनविण्यास तयार; सुप्रिम कोर्टात प्रतिज्ञापत्र
- राज्यपालांनी ८० व्या वर्षी सर केला सिंहगड, महिलांनी कौतुकाने ओवाळले; उत्तराखंडमध्ये येण्याचे स्थानिकांना आमंत्रण
- शिवाजी महाराज हे देशाचा अभिमान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली सिंहगडाला भेट