Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू होताच परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तालिबानने सत्ता हाती घेण्यापूर्वी अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती राहिलेल्या अमरुल्ला सालेह यांचे मोठे बंधू रोहुल्लाह सालेह यांची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या हवाल्याने अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी असा दावा केला आहे की, तालिबानकडून छळ करून त्यांना ठार मारण्यात आले आहे. Afghanistan Crisis Amrullah Salehs Brother Rohullah Tortured To Death By Taliban Claimed Report
वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू होताच परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तालिबानने सत्ता हाती घेण्यापूर्वी अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती राहिलेल्या अमरुल्ला सालेह यांचे मोठे बंधू रोहुल्लाह सालेह यांची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या हवाल्याने अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी असा दावा केला आहे की, तालिबानकडून छळ करून त्यांना ठार मारण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्समध्ये हिंसक चकमक झाली. या घटनेत सालेह यांचे मोठा बंधू ठार झाले. तालिबान्यांनी रोहुल्ला सालेहवर खूप अत्याचार केल्याचे वृत्त आहे. मात्र, आतापर्यंत याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
तालिबानने पंजशीरवर विजयाचा दावा केला आहे. ज्या ठिकाणी अमरुल्ला सालेहने व्हिडीओ स्टेटमेंट जारी केले होते, त्याच ठिकाणी तालिबानी लढाऊ बसल्याच्या फोटोनंतर हा दावा करण्यात आला आहे की, ते अजूनही पंजशीरमध्ये आहेत. तालिबान्यांनी अमरुल्ला सालेह राहत असलेल्या ठिकाणचे ग्रंथालय ताब्यात घेतल्याच्या दाव्यासह हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंजशीर स्वातंत्र्यासाठी लढा
पंजशीर हा एकच असा भाग आहे जिथे अजूनही तालिबानविरोधात लढा सुरू आहे. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलचा ताबा घेतला. मात्र, पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्सने स्वातंत्र्याचा संघर्ष सुरूच ठेवला. अशरफ घनी देश सोडून गेल्यानंतर अमरुल्लाह सालेह यांनी पंजशीरच्या लढवय्यांना खुले समर्थन दिले. अनेक प्रसंगी तालिबान्यांना त्यांच्या बाजूने उधड इशारेही देण्यात आले आहेत.
Afghanistan Crisis Amrullah Salehs Brother Rohullah Tortured To Death By Taliban Claimed Report
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यसभेतील गोंधळ : खर्गे म्हणाले – आता प्रकरण मिटले आहे, त्यामुळे चौकशी समितीची गरज नाही
- देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दिलासादायक बातमी, जुलैमध्ये औद्योगिक उत्पादन 11.50 टक्क्यांनी वाढले
- मायावतींनी आत्तापर्यंत पोसलेले गुंड आता चालले ओवैसींच्या आश्रयाला; आधी अतिक अहमद, आता मुख्तार अन्सारीला ऑफर
- संतापजनक : मुंबईत ‘निर्भया’सारखी घटना, बलात्कारानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड, प्रकृती गंभीर
- West Bengal Bypolls : पोटनिवडणुकीसाठी ममतांचा भवानीपूरमधून अर्ज दाखल, भाजपकडून प्रियांका टिबरेवाल यांचे आव्हान