विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – ‘‘अफगाणिस्तानमधील मोठ्या प्रमाणात सुरू असलेली स्थलांतर मोहीम ही इतिहासातील सर्वांत मोठ्या व अत्यंत अवघड मोहिमांपैकी एक असून यात लोकांचा जीव जाण्याचा धोका नाकारता येणार नाही, याकडे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी लक्ष वेधले आहे.Afghan evacuation is challenging – biden
अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैन्य ३१ ऑगस्टपूर्वी बाहेर काढण्या साठी बायडेन प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. व्हाइट हाउसमधील भाषणात ते म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकी नागरिकांच्या सुटकेसाठी त्यांचे प्रशासन प्रयत्न करीत आहे.
जुलैपासून १८ हजारपेक्षा जास्त लोकांनी परत आणले आहे. ‘एअरलिफ्ट’ मोहिमेत १३ हजार लोकांना काबूलबाहेर काढण्यात आले आहे.अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य मागे घेण्याच्याो निर्णयाचे बायडेन यांनी पुन्हा एकदा समर्थन केले. काबूल विमानतळावर जो गोंधळ झाला तेव्हापासून स्थलांतराच्या कार्यात अमेरिकेने मोठी प्रगती केली आहे ‘ज्याव अमेरिकी नागरिकाला मायदेशी परतण्याची इच्छा आहे,
त्यांना आम्ही परत आणू, असे मी स्पष्ट करू इच्छितो,’ असा दिलासा त्यांनी अफगाणिस्तानमधील अमेरिकी नागरिकांना दिला. असेच आश्वाासन अमेरिकी सैन्यदलाने ५० ते ६५ हजार अफगाणी सहयोगी दलांना दिले आहे. पण अमेरिकी नागरिकांना बाहेर काढण्यास प्राधान्य देणार आहे, असे बायडेन यांनी स्पष्ट केले.
Afghan evacuation is challenging – biden
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तराखंडमध्ये साकारतेय देशातील सर्वाधिक उंचीवरील पहिलेच हर्बल पार्क
- पाकिस्तानच्या दबावामुळे तालिबान्यांनी विमानतळाबाहेर भारतीयांना रोखले कागदपत्रांवरून घेतली झडाझडती
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, वेगवान मुंबईत कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर आला एक टक्यांवर
- कर्नाटक सरकार काळ्या बुरशीने ग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देणार