विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात गेल्या वर्षभरात सर्वाधिक वेगाने श्रीमंत झालेले गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपने आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला जोरदार धक्का दिला आहे. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने श्रीलंकेत मोठा करार केला आहे. कंपनीला अशा एका बंदराचा विकास आणि आॅपरेट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चीनच्या विरुद्ध सामरिक दृष्टिकोनातून हा करार महत्वाचा मानला जात आहे. Adani Group pushes China, wins Sri Lanka port contract
अदानी ग्रुपने श्रीलंकेच्या सरकारी मालकीच्या श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटीसोबत वेस्टर्न कंटेनर टर्मिनल विकसित आणि ऑपरेट करण्यासाठी करार केला. यासह श्रीलंकेतील बंदर टर्मिनलची जबाबदारी स्वीकारणारी पहिली भारतीय कंपनी बनली. हे टर्मिनल श्रीलंकेतील कोलंबो बंदरात आहे.वेस्टर्न कंटेनर टर्मिनलमध्ये अदानी ग्रुपचा 51 टक्के हिस्सा असेल. स्थानिक कंपनी जॉन कील्स होल्डिंग्जच्या सहकायार्ने बिल्ड-आॅपरेट-ट्रान्सफरच्या (बीओटी)आधारावर टर्मिनल विकसित करेल. या प्रकल्पात स्थानिक भागीदारांची अनुक्रमे 34 टक्के आणि 15 टक्के भागीदारी असेल.
श्रीलंकेच्या कोलंबो बंदराचा भारतीय कंटेनर आणि मुख्य जहाज जहाज चालकांसाठी खूप उपयोग आहे. ट्रान्सशिपमेंटसाठी ही त्याची पहिली पसंती आहे. याशिवाय, भारत आणि जपानसह चार देशांनी इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता हस्तक्षेप मर्यादित करण्यासाठी क्वाड ग्रुपची स्थापना केली आहे. या बैठकीत बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते. या ग्रुपमध्ये अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. अशा स्थितीत केवळ श्रीलंकेच्या या बंदरालाही सामरिक महत्त्व आहे.
चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड उपक्रमाचा भाग म्हणून श्रीलंकेतील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. श्रीलंकेतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये चीनने 8 अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 594 अब्ज रुपये) गुंतवले आहेत. कोलंबोने कर्जाची अदला बदली म्हणून 2017 मध्ये आपले हंबनटोटा बंदर बीजिंगला दिले होते.
Adani Group pushes China, wins Sri Lanka port contract
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला