ही घटना शनिवारची आहे. सध्या अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यामुळे हजारो अफगाण नागरिक आपला देश सोडण्यासाठी मजबूर झाले आहेत. प्रसूत झालेली महिला अशाच नागरिकांपैकी एक आहे.A woman gave birth to a cute baby girl at an altitude of 28,000 feet, gave birth in C-17 Globemaster
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन: काबूलमधून निघालेल्या अमेरिकेच्या लष्करी विमानामध्ये एका अफगाणि महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. जर्मनीच्या रामस्टीन एअर बेसवर विमानाने लँडिंग करताच महिलेची प्रसूती झाली.
ही घटना शनिवारची आहे. सध्या अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यामुळे हजारो अफगाण नागरिक आपला देश सोडण्यासाठी मजबूर झाले आहेत. प्रसूत झालेली महिला अशाच नागरिकांपैकी एक आहे.
C-17 ग्लोब मास्टर विमानामध्ये असताना या महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या असे यूएस एअर मोबिलिटी कमांडने रविवारी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. “विमान २८ हजार फूट उंचीवर असताना विमानात हवेचा दाब कमी असल्याने महिलेला त्रास सुरु झाला” असे अमेरिकन एअर फोर्सने सांगितलं.
विमानाच्या कमांडरने विमानात हवेचा दाब वाढवण्यासाठी विमानाला खाली आणलं. ज्यामुळे महिलेची प्रकृती थोडी स्थिर झाली व तिला वाचवता आलं, असं यूएस एअर फोर्सकडून सांगण्यात आलं.
जर्मनीच्या रामस्टीन एअर बेसवर विमानाने लँडिंग करताच एअर फोर्सच्या ८६ व्या मेडिकल ग्रुपमधील डॉक्टरांनी महिलेची प्रसुती केली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. बाळाला आणि आईला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे.
A woman gave birth to a cute baby girl at an altitude of 28,000 feet, gave birth in C-17 Globemaster
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानच्या दबावामुळे तालिबान्यांनी विमानतळाबाहेर भारतीयांना रोखले कागदपत्रांवरून घेतली झडाझडती
- स्फोटक अफगणिस्तानमधून ४०० भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका, भारताच्या भूमीत आल्याचा आनंद
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची युवकाला आस; श्रीनगर ते दिल्ली असा ८५० किलोमीटरचा करणार चालत प्रवास
- नोकरी गमावलेल्यांना लाखो कामगारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा, सरकार २०२२ पर्यंतचा ‘पीएफ’ भरणार