वाहन उलटल्याने तीन जण जखमी; इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले…
प्रतिनिधी
तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी लाहोरहून इस्लामाबादला जाणाऱ्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ताफ्यातील एका कारला अपघात झाला. पाकिस्तानी मीडियाने याबाबत माहिती दिली. वाहन उलटल्याने तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. A vehicle in the convoy of former Pakistan PM Imran Khan met with an accident
या अपघातात इम्रान खान पूर्णपणे सुरक्षित असून ते इस्लामाबादला रवाना झाले आहेत. इम्रान खान यांच्या ताफ्यातील ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या. वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अपघातानंतर माजी पंतप्रधान म्हणाले की, मला थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना मला अटक करायची आहे. हा लंडन योजनेचा भाग आहे. इम्रान यांना तुरुंगात टाकावे, अशी नवाझ शरीफ यांची मागणी आहे. मी कोणत्याही निवडणुकीत भाग घ्यावा, असे त्यांना वाटत नाही. माझा कायद्यावर विश्वास आहे, त्यामुळे मी न्यायालयात हजर राहणार आहे.
माझा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे – इम्रान खान
लाहोरहून इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी इम्रान खान यांनी ट्विट केले की, “माझ्या सर्व खटल्यांमध्ये जामीन मिळूनही पीडीएम सरकार मला अटक करू इच्छित आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांचे दुर्भावनापूर्ण हेतू माहित असूनही, मी इस्लामाबाद आणि न्यायालयात जात आहे कारण माझा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे.”
A vehicle in the convoy of former Pakistan PM Imran Khan met with an accident
महत्वाच्या बातम्या
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!
- फरार बुकी अनिल जयसिंघानियाचा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा फोटो व्हायरल; पण तो नेमका केव्हाचा??
- विरोधी ऐक्याची कोलकत्यात चर्चा; कर्नाटकात काँग्रेसचा ऐक्याला सुरूंग!!
- नवीन पेन्शन योजनेत शिंदे – फडणवीस सरकार करणार सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय